मेरठमधील सौरभ हत्याकांड प्रकरणात एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आरोपी मुस्कान तिची मुलगी पिहू आणि पती सौरभसोबत नाचताना दिसत आहे. पिहूचा वाढदिवस २८ फेब्रुवारी रोजी होता आणि हा व्हिडीओ त्याच दिवशीचा असल्याचं म्हटलं जातं. व्हिडिओमध्ये मुस्कान तिचा पती आणि मुलीसोबत एका रेस्टॉरंटमध्ये आनंदाने नाचत आहे. हा व्हिडीओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नसली तरी तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लोक म्हणतात की, हा व्हिडीओ मुस्कानच्या चलाखीचा पुरावा आहे. तिने तिच्या पतीचा खून करण्याचा संपूर्ण प्लॅन आधीच केला होता, पण जगासमोर स्वतःला एक आदर्श पत्नी म्हणून दाखवण्यासाठी, ती त्याच्यासोबत अशा प्रकारे नाचत आहे जणू ती त्याच्यावर खूप प्रेम करते.
काही महिन्यांपूर्वीच रचला कट
मुस्कानने तिचा प्रियकर साहिल शुक्लासह काही महिन्यांपूर्वी तिचा पती सौरभला संपवण्याचा कट रचला होता. पतीला मारण्यापूर्वी कोणीही तिच्या हेतूवर शंका घेऊ नये म्हणून ती प्रेमाचं खोटं नाटक करत राहिली. ४ मार्चच्या रात्री मुस्कानने तिचा पती सौरभला जेवणात काही अमली पदार्थ दिले. जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा तिने साहिलला फोन केला. दोघांनी मिळून सौरभच्या छातीत वार केले आणि नंतर त्याचा गळा चिरला.
खून केल्यानंतर मुस्कान आणि साहिल यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी तिने बाजारातून एक मोठा प्लास्टिकचा ड्रम, सिमेंट आणि वाळू विकत घेतली. मृतदेह एका ड्रममध्ये टाकण्यात आला, सिमेंट आणि वाळूने भरून घरात लपवण्यात आला.
हत्येनंतरही दोघेही निश्चिंत होते. ते मनालीला फिरण्यासाठी गेले जसं काही काहीच घडलं नाही. याच दरम्यान, मुस्कानने तिच्या आईसोबत राहणाऱ्या तिच्या मुलीशी फोनवर बोलली आणि नंतर ती रडू लागली. आईला संशय आल्यावर तिने तिला घरी बोलावलं. यानंतर सौरभच्या हत्येचा खुलासा झाला.
"पप्पा, ड्रममध्ये आहेत..."; शेजाऱ्यांना सांगायची चिमुकली लेक; मजुरांना 'असा' सापडला मृतदेह
मुस्कान आणि साहिल यांनी मिळून सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये लपवले. घरमालकाने मुस्कानला घर रिकामं करण्यास सांगितलं होतं, तेव्हाच तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन केला. रेणू देवी म्हणाल्या की, कदाचित सौरभच्या लेकीलाही याबद्दल माहिती असेल. पप्पांना ड्रममध्ये ठेवण्यात आलं आहे असं तिने शेजाऱ्यांना सांगितलं होतं. हे ऐकून कुटुंबाला आणखी धक्का बसला.