UP Crime: उत्तर प्रदेशातील मेरठच्या दौराला परिसरात तिघांच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा प्रकार विषारी दारूमुळे (Hooch घडल्याचा संशय होता, मात्र पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास केला, तेव्हा हादरवणारे सत्य समोर आले. सख्ख्या बहिणीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने भावाचा काटा काढण्यासाठी दारूच्या टेट्रा पॅकमध्ये सायनाइड मिसळले होते. मात्र, भावासोबत त्याच्या दोन मित्रांनीही तीच दारू प्यायल्याने एकाच्या ऐवजी तिघांचा मृत्यू झाला.
३ एप्रिलच्या रात्री अंकित ऊर्फ दौलत, बाबूराम आणि जितेंद्र या तिघांचा दारू प्यायल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत मृत्यू झाला. गावात विषारी दारूमुळे बळी गेल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, पोलिसांनी दुकानातून विकल्या गेलेल्या इतर बाटल्यांची तपासणी केली असता, कोणालाही त्रास झाला नसल्याचे समोर आले. संशय बळावल्याने पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली आणि मोबाईल रेकॉर्ड्स तपासले.
बहिणीनेच रचला 'खूनी' कट
मयत अंकितची बहीण अलका आणि तिचा प्रियकर पवन यांना ताब्यात घेतल्यावर या थरारक कटाचा उलगडा झाला. अंकितचा अलका आणि पवनच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. तो दारूच्या नशेत अलकावर वारंवार हात उचलत असे, तसेच तिच्याशी गैरवर्तनही करत असे. या छळाला कंटाळून अलकाने पवनसोबत मिळून भावाला संपवण्याचे ठरवले.
५०० रुपयांत खरेदी केले 'सायनाइड'
पवनने अशोक नावाच्या एका सोनाराकडून अवघ्या ५०० रुपयांत सायनाइड विकत घेतले. दागिन्यांच्या स्वच्छतेसाठी वापरले जाणारे हे विष अत्यंत घातक असते. सुरुवातीला त्यांनी हे विष अन्नात मिसळण्याचा प्रयत्न केला, पण अलका घाबरल्याने तो प्रयत्न फसला. त्यानंतर पवनने १०० रुपये देऊन एका स्थानिक तरुणाकडून दारूचा टेट्रा पॅक मागवला. त्याने अतिशय शिताफीने तो पॅक उघडून त्यात सायनाइड मिसळले आणि फेविक्विकच्या मदतीने तो पुन्हा सील केला, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.
गुगल सर्च ठरला महत्त्वाचा पुरावा
या प्रकरणाचा छडा लावण्यात डिजिटल पुराव्यांनी मोठी भूमिका बजावली. आरोपी पवनच्या मोबाईलमध्ये गेल्या महिनाभराची गुगल सर्च हिस्ट्री तपासली असता, त्याने सायनाइड कोठे मिळते? ते शरीरात गेल्यावर किती वेळात मृत्यू होतो? आणि ते दारूत कसे मिसळावे? याबद्दल सतत शोध घेतल्याचे स्पष्ट झाले. या ठोस पुराव्यामुळे आरोपी अडकले.
एकाचा जीव घ्यायचा होता, गेले तिघे
अंकितला दारूचे व्यसन असल्याने त्याने तो टेट्रापॅक घेतला. मात्र, त्याने ती दारू एकट्याने न पिता मित्र बाबूराम आणि जितेंद्र यांनाही दिली. सायनाइड इतके जहाल होते की, दारू पिताच अवघ्या चार मिनिटांत तिघांचेही प्राण गेले. मेरठ पोलिसांनी या प्रकरणी सख्खी बहीण अलका, प्रियकर पवन आणि विष पुरवणारा सोनार अशोक या तिघांनाही अटक केली असून त्यांच्यावर हत्या आणि गुन्हेगारी कटाचे गुन्हे दाखल केले आहेत.
Web Summary : In UP, a woman and her lover poisoned her brother's drink with cyanide due to a family dispute. Tragically, two of his friends also consumed the drink, resulting in three deaths. Google searches aided the crime.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक महिला ने अपने प्रेमी के साथ मिलकर पारिवारिक विवाद के चलते भाई के पेय में जहर मिला दिया। दुर्भाग्य से, उसके दो दोस्तों ने भी वह पेय पिया, जिससे तीन लोगों की मौत हो गई। गूगल सर्च से अपराध में मदद मिली।