शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पॉर्न शूटला नकार दिल्याने गुंगीचे औषध; तरुणीनं सांगितली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 03:46 IST

१० लाखांची मागणी, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

मुंबई : मुंबईच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री होण्याचे स्वप्न घेऊन झारखंडच्या तरुणीनेही धाव घेतली. कामाच्या शोधात ती या पॉर्न फिल्म प्रोडक्शनची शिकार ठरली. तिने पॉर्न शूटला नकार दिला म्हणून एनर्जी ड्रिंकमधून गुंगीचे औषध देत शूट करून घेतल्याचा प्रकार तरुणीच्या तक्रारीतून समोर आला. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात रोवा खान ऊर्फ यास्मीन खानविरुद्ध स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मूळची झारखंडची  असलेल्या १९ वर्षीय रेश्माने (नावात बदल) मुंबईत आल्यावर  अभिनेत्री गहना वशिष्ठसोबत वेबसीरिजमध्ये काम केले. त्यानंतर २९ डिसेंबरला संतोष नावाच्या व्यक्तीने कॉल करून वेबसीरिजमध्ये काम असल्याचे संबंधित सीरीज फक्त ‘हॉटहिटमूव्हिज’ या ॲपवर प्रसारित होणार असल्याचे सांगितले. तिला ३० डिसेंबर रोजी मढ येथील ग्रीन पार्क बंगला येथे बोलावले. आलिशा म्हणजे रोवाने करारावर सही करून घेतली. त्यात न्यूड सीनचा उल्लेख नव्हता.पहिला सीन मुलीसोबत पार पडला.  दुसऱ्या सीनमध्ये मुलासोबत  बेड सीन करण्यास सांगितले. तिने नकार देताच, १० लाख रुपये भरावे लागतील अन्यथा पोलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली. अखेर काही वेळाने एनर्जी ड्रिंक दिले. त्यातच गुंगीचे औषध देऊन बेड सीन करून घेतल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे.त्यानंतर २८ जानेवारीला तिचे पॉर्न व्हिडीओ शेअर होत असल्याचे तिला समजले.तिने लिंक पाहताच तो व्हिडीओ ग्रीन पार्क येथील असल्याचे समजले. तिने याबाबत यास्मीनकडे चौकशी केली तेव्हा, तू काम केले ते प्रसारित होणारच होते, असे सांगून तिने फोन कट केला. त्यानंतर फोन घेणे बंद केले. त्यानंतर ४ फेब्रुवारी रोजी तिने मुंबई गाठून घडलेला प्रकार वकिलाला सांगून सोमवारी मालवणी पोलिसात याप्रकरणी तक्रार दिली. लढा देणार, आराेपींना शिक्षा झालीच पाहिजेया व्हिडीओबाबत आईवडिलांना समजताच त्यांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली. गावात जगणे मुश्किल झाले. मुंबई पोलिसांकडून सहकार्य मिळत आहे. माझ्यासोबत झाले ते अन्य मुलींसोबत नको म्हणून मी याविरोधात लढा देणार आहे. आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे.-  तक्रारदार तरुणी