शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

नागपुरात एमडी तस्करीचे रॅकेट उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:32 IST

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात जमाल खान आणि मुंबईवरून एमडीचा पुरवठा करणाऱ्या नजीम शेख आणि त्याचा कुरियर मॅन शाहबाज खान याला अटक केली.

ठळक मुद्देगुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलची कामगिरी : मुंबईतून एमडी उपलब्ध करणाऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात जमाल खान आणि मुंबईवरून एमडीचा पुरवठा करणाऱ्या नजीम शेख आणि त्याचा कुरियर मॅन शाहबाज खान याला अटक केली. या कारवाईमुळे शहरातील एमडीचा कारभार प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.जमाल हा गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. सहा महिन्यांपूर्वी नंदनवन पोलिसांनी त्याला एमडीसह पकडले होते. त्याच्याजवळून एक लाख रुपयाची एमडी आणि अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले होते. तो पोलिसांना गुंगारा देऊन पळाला होता. नंदनवन पोलिसांच्या पथकाने एमडी व त्याच्याजवळची रक्कम जप्त करण्याऐवजी आपल्याजवळ ठेवली होती. जमालने एमडी जावेदकडून घेतली होती. हा प्रकार समोर येताच नंदनवन पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांना अटक करून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी पोलीस कर्मचारी अजूनही तुरुंगात आहेत, तर जावेद जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एमडीची तस्करी करीत होता. नुकतेच त्याला नंदनवन पोलिसांनी पुन्हा एमडी तस्करी करताना पकडले. यानंतर जमाल पकडला जात नसल्याने प्रश्न निर्माण झाले होते. लोकमतने तो बुटीबोरीत लपून बसल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर एनडीपीएस सेल कामाला लागले. जमालला याची माहिती होताच तो उमरखेड (यवतमाळ) येथील आपल्या सासरी पळून गेला. एनडीपीएस सेलला याची माहिती होताच त्यांनी सापळा रचून त्याला पकडले.त्याचप्रकारे दुसऱ्या एका प्रकरणात एनडीपीएस सेलने ११ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे येथील गुन्हेगार संदेश मून याला एक लाख रुपयाच्या एमडीसह पकडले होते. तो मुंबईवरून एमडी घेऊन आला होता. संदेशने मुंबईच्या नजीम शेख गुलमोहम्मद शेख (२९) याच्याकडून एमडी खरेदी केल्याचे सांगितले होते. एमडीची डिलिव्हरी देण्यासाठी शहबाज रमजान खान नागपूरला आला होता. तेव्हापासून एनडीपीएस सेल नजीम आणि शहबाजच्या शोधात होते. पोलिसांनी मुंबईत सापळा रचून दोघांना अटक केली. नजीम एमडी तस्करीतील मोठा मासा आहे. तो अनेक वर्षांपासून एमडी तस्करी करतो. नागपुरात त्याचे अनेक ग्राहक आहेत.ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सार्थक नेहेते, एपीआय विजय कसोधन, एएसआय बयाजीराव कुरले, राजकुमार देशमुख, विठोबा काळे, हवालदार प्रदीप पवार, प्रशांत देशमुख, सतीश मेश्राम, नृसिंह दमाहे, शिपाई राकेश यादव, सतीश निमजे, नामदेव टेकाम, नितीन रांगने, नितीन मिश्रा, राहुल गुमगावकर, नितीन साळुंके, नरेश शिंगणे यांनी केली.शहबाज केवळ डिलिव्हरी बॉयशहबाज केवळ डिलिव्हरीचे काम करतो. तो एका महिन्यात तीन ते चार वेळा नागपूरला येतो. प्रत्येक डिलिव्हरीसाठी त्याला येण्या-जाण्यासाठी कंफर्म रेल्वे तिकीट आणि ५ हजार रुपये दिले जातात. अशा पद्धतीने तो नागपूर ते मुंबई ये-जा करून १५ ते २० हजार रुपये कमावतो. शहबाजप्रमाणेच मुंबईवरून अनेक युवक एमडीची डिलिव्हरी देण्यासाठी येतात. त्यामुळे शहरात एमडी तस्करीचे मोठे रॅकेट असल्याचे दिसून येते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थArrestअटक