शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! वाढदिवस ठरला शेवटचा; रात्री केक कापला अन् सकाळी मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:25 IST

डेंटल कॉलेजमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

कानपूर येथील डेंटल कॉलेजमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हॉस्टेलच्या बेसमेंटमध्ये मृतदेह आढळून आला. हत्येचा आरोप करत मृताच्या कुटुंबीयांनी पोलीस आणि कॉलेज व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपल्या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्याची हत्या करण्यात आली आहे. एसआयटी चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. घटनेच्या दोन दिवस आधी विद्यार्थ्याचा वाढदिवस होता. तो मित्रांना वाढदिवसाची पार्टी देत ​​होता.

ही संपूर्ण घटना बिथूर पोलीस स्टेशन परिसरातील रामा डेंटल कॉलेजचं आहे, जिथे रविवारी हॉस्टेल बेसमेंटमध्ये एमबीबीएस सेंकड ईयरचा विद्यार्थी साहिल सारस्वत याचा मृतदेह आढळून आला. विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

मुलाचे वडील बृजमोहन सारस्वत यांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलच्या डोक्यावर जखमा आढळून आल्या आहेत. शरीरावर अनेक ठिकानी खुणा आढळल्या. वैयक्तिक वादातून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी योग्य तपास केला नसल्याचा आरोपही केला जात आहे. साहिल त्यांचा एकुलता एक मुलगा होता. सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. 

वाढदिवसाची दिली पार्टी 

रविवारी सकाळी कॉलेजच्या बेसमेंटमध्ये साहिलचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुरुवातीला मृत्यू संशयास्पद मानून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचलेल्या बृजमोहन सारस्वत यांनी साहिलची हत्या झाल्याचा दावा केला. 24 तारखेला त्यांचा मुलगा साहिलचा वाढदिवस होता, असे ते सांगतात. त्याने पार्टी दिली. काल रात्रीही मी त्याच्याशी फोनवर बोललो. सगळं नॉर्मल होतं. काहीही चुकीचे वाटत नव्हते. त्यानंतर सकाळी मृत्यूची बातमी आली.

"एकुलत्या एका मुलाची हत्या"

बृजमोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिलची हत्या झाल्याचं पोलीस आणि कॉलेज प्रशासनाने लपवण्याचा प्रयत्न केला. मारेकरी कॉलेजमध्येच आहेत. साहिल माझा एकुलता एक मुलगा होता. त्याचा मृतदेह जिथे सापडला तिथे सगळीकडे रक्त पसरले होते. चेहऱ्यावर खुणा होत्या. डोक्यावर रॉड आदींनी मारल्याच्या खुणा होत्या. त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बेसमेंटमध्ये टाकण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी