शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांवरील गोळीबार : सीसीटीव्ही ताब्यात, रिकाम्या बुलेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 21:19 IST

महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळासोबतच पोलीस प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली आहे. या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला

ठळक मुद्देतपासचक्र वेगात, पाच पथकांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौरसंदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळासोबतच पोलीस प्रशासनातही प्रचंड खळबळ उडाली आहे. या गोळीबाराचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून, पोलीस आयुक्त, सहआयुक्त स्वत: तपासाच्या प्रत्येक घडामोडीवर नजर ठेवून आहेत. दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी या गोळीबाराचा तीव्र निषेध नोंदवून बेलतरोडी पोलीस ठाण्याला बुधवारी घेराव घातला. २४ तासांच्या आत आरोपींना अटक करा, अशी त्यांची मागणी आहे.

महापौर जोशी कौटुंबिक मित्र-परिवारातील सदस्यांसह मंगळवारी रात्री नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जवळ असलेल्या रसरंजन ढाब्यावरून जेवण करून परत येत होते. त्यांच्या वाहनामागून दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी जोशी यांच्या वाहनावर(एमएच ३१/एफए २७००) चार गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यातील एकही गोळी जोशी किंवा त्यांच्या सोबत बसून असलेले त्यांचे मित्र आदित्य ठाकूर यांना लागली नाही. या गोळीबाराच्या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून रात्रीच वाहनावरील गोळीबाराचे नमुने तसेच रिकाम्या बुलेट जप्त केल्या. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पाच वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून, शहरातील प्रत्येकच पोलीस या प्रकरणातील आरोपींची माहिती काढण्यासाठी कामी लागला आहे. तपासाशी संबंधित प्रत्येक घडामोडीची माहिती पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय आणि सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम घेत आहेत. खापरी ते रसरंजन तसेच बाजूच्या एम्प्रेस पॅलेससह ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मार्गावर तसेच आजूबाजूची हॉटेल्स, ढाब्यांवर मंगळवारी रात्री कोण आले, कोण गेले, त्याचीही माहिती काढली जात आहे. 
दरम्यान, हा गोळीबार कोणत्या हेतूने कुणी केला, त्याचा तपास केला जात आहे. जोशी यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेमुळे दुखावलेल्यांपैकी कुणाचा यात हात आहे का, त्याचीही पडताळणी केली जात आहे. या संबंधाने पोलिसांनी सकाळपासून १०० पेक्षा जास्त जणांना विचारपूस केली. वृत्त लिहिस्तोवर अनेकांची चौकशी केली जात होती.जोशींना सुरक्षा !राज्य सरकारने या हल्लयाची गंभीर दखल घेतली असून गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापौर जोशी यांना बोलवून त्यांची विचारपूस केली. तुम्ही काळजी करू नका, हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, जोशी यांना संरक्षण देण्यात आले असून, त्यांना सशस्त्र सुरक्षा रक्षक सोबत देण्यात आला आहे. त्यांच्या निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीMayorमहापौरFiringगोळीबार