शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

महारयतने घातला गंडा; राज्यातील पाच हजार शेतकऱ्यांची ७० कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:33 IST

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रोड्यूस वाँरन्टवर दोघांना कोल्हापूर येथून घेतले ताब्यात

अमरावती : कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायात महारयत अ‍ॅग्रो इंडिया कंपनीने राज्यभरातील पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत पुढे आली आहे. अमरावती येथील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रोड्यूस वाँरन्टवर सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा.इस्लामपूर, जि. सांगली) या दोघांना कोल्हापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यांना अमरावती येथील न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महारयतचा संचालक सुधीर माहिते याने सहकारी संदीप मोहिते याच्या मदतीने राज्यभरातील अनेक ठिकाणी कृषी प्रदर्शनात स्टॉल लावले होते. त्यांच्या कंपनीत ५२५ कर्मचारी कार्यरत होते. त्यांच्या माध्यमातून या कंपनीशी राज्यभरातील अनेक शेतकरी जुळले. १०० कडकनाथ कोंबड्यांमागे तब्बल ३ लाख १५ हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची हमी त्यांनी शेतकऱ्यांना दिली. पक्षी व अंडी आम्हीच खरेदी करू, असेही सांगितले होते. मात्र, कंपनीकडून कुठल्याही प्रकारची सुविधा अथवा कोंबड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेक शेतक-यांकडील कोंबड्या दगावल्या.अंडी कुचकामी ठरली; ती फेकून द्यावी लागली. ही फसवणूक पाहता राज्यभरातील शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रारी नोंदविल्या. या कंपनींच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांविरुद्ध राज्यभरात ११ ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व अमरावती शहर तसेच ग्रामीण भागात हे गुन्हा नोंदविण्यात आले आहे. तब्बल पाच हजार शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटींनी फसवणूक झाल्याचा अंदाज पोलीस चौकशीत पुढे आला आहे. अमरावती पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नाहीतराज्यभरातील शेतकऱ्यांना गंडा घालणारे आरोपी हे ‘मोहिते बंधू’ नावाने प्रसिद्धीस आले असले तरी ते एकमेकांचे भाऊ नाहीत. मोहितेवाडीत राहणारे असल्यामुळे या दोघांना ‘मोहिते बंधू’ म्हणून ओळखले जात आहे. ते केवळ कोंबडीपालन व्यवसायात खाद्य पुरवठादार आहेत. 

कोट्यवधींची संपत्ती जप्तआर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस हवालदार राजेश शेंडे, शैलेश रोंघे, दीपक धोटे यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची इस्लामपुरातील अंडी उबवण केंद्रातील मशीनरी, तीन महागडी वाहने जप्त केली. आणखी मालमत्ता उघड करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केले आहे. 

अमरावतीमधील दहा शेतकऱ्यांची फसवणूकजगदीश कृष्णराव कुचे (३५, रा.शिवार्पण कॉलनी), प्रमोद भाऊराव ठाकरे (४५, रा. अभियंता कॉलनी) व दीपक देवीदास कोहळे (४२, रा.गाडगेनगर) या शेतकºयांनी सदर कंपनीत ५ लाख ३० हजार रुपये गुंतविले होते. त्यांनी फसवणुकीची तक्रार गाडगेनगर पोलिसांत नोंदविली आहे. पोलीस चौकशीत आरोपींनी जिल्हाभरातील दहा शेतकऱ्यांची १७ लाख १५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrime Newsगुन्हेगारी