शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

होय मी अनेकांचे खून केले, ५० पर्यंत मोजले, पुढचं माहीत नाही; डॉक्टरचा धक्कादायक जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 14:02 IST

५० पेक्षा अधिक जणांच्या हत्या करणाऱ्या डॉक्टराला बेड्या; अवैध किडनी प्रत्यारोपण केल्याचाही गुन्हा

नवी दिल्ली: चार राज्यांमध्ये ५० हून अधिक जणांच्या हत्या करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात आरोपीनं अनेकांच्या हत्या केल्या. त्यामध्ये प्रामुख्यानं ट्रक आणि टॅक्सी चालकांचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डॉक्टराला अटक केली. चौकशीत त्यानं हत्यांची कबुली दिली. आपण ५० पर्यंत हत्या मोजल्या. मात्र त्यानंतरची मोजणी चुकली, असा धक्कादायक जबाब डॉक्टरनं दिला आहे. देवेंद्र शर्मा असं या डॉक्टरचं नाव आहे.हत्या केल्यानंतर मृतदेह नदीत फेकून द्यायचो. त्या नदीत मगरींची संख्या खूप होती, अशी माहिती शर्मानं पोलिसांना दिली. शर्मानं बीएमएसचा अभ्यास केला आहे. तो सध्या दिल्लीतल्या बापरोलामध्ये वास्तव्यास होता. दिल्ली पोलीस दलात निरीक्षक असलेल्या राममनोहर यांच्या पथकाला शर्माच्या ठावठिकाण्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी राकेश पावरिया यांनी दिली. ६२ वर्षांचा देवेंद्र मूळचा अलीगढचा रहिवासी आहे. बिहारच्या सीवानमधून १९८४ साली बीएमएसची डिग्री घेतली. त्यानंतर जयपूरमध्ये एक दवाखाना सुरू केला, अशी माहिती शर्मानं पोलिसांना दिली.१९९४ मध्ये एका गॅस एजन्सीची डिलरशिप मिळवण्यासाठी शर्मानं ११ लाख रुपये खर्च केले. मात्र कंपनीतल्या लोकांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केली. त्यामुळे देवेंद्र शर्माचे पैसे बुडाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी देवेंद्रनं १९९५ साली अलीगढमध्ये एक बोगस गॅस एजन्सी सुरू केली. सुरुवातीला त्यानं लखनऊहून काही सिलिंडर आणि गॅस शेगड्या आणल्या. मात्र त्यानंतर त्याला सिलिंडर आणणं अवघड जाऊ लागलं. त्याचवेळी तो उदयवीर, वेदवीर आणि राजच्या संपर्कात आला. चौघे मिळून गॅस सिलिंडरनं भरलेल्या ट्रकच्या चालकांच्या हत्या करायचे. त्यानंतर ते सिलिंडर आपापल्या गॅस एजन्सीमध्ये न्यायचे आणि मेरठला नेऊन ट्रकचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करायचे.बोगस गॅस एजन्सी चालवत असल्याच्या आरोपाखाली देवेंद्रला अटक झाली. मात्र जामीन मिळाल्यानंतर त्यानं अमरोह्यात पुन्हा एकदा गॅस एजन्सी सुरू केली. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा जामिनावर बाहेर आला. मग तो अवैध किडनी प्रत्यारोपित करणाऱ्या एका टोळीत सहभागी झाला. जयपूर, वल्लभगढ आणि गुरुग्राममध्ये त्यानं १२५ जणांच्या किडनी प्रत्यारोपित केल्या.एका किडनी प्रत्यारोपणातून देवेंद्रला ५ ते ७ लाख रुपये मिळायचे. २००४ मध्ये गुरुग्रामच्या अनमोल नर्सिंग होमवर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी किडनीचं अवैध प्रत्यारोपण करणाऱ्या टोळीचा म्होरक्या असलेल्या डॉक्टर अमितसोबत देवेंद्रलादेखील अटक झाली. त्यावेळी त्यानं चौकशीत ५० हून अधिक अधिक ट्रक चालकांच्या हत्या केल्याची माहिती दिली. यातल्या ७ प्रकरणांमध्ये त्याला शिक्षा झाली. तो जयपूरमधील तुरुंगात शिक्षा भोगत होता. जानेवारीत त्याला २० दिवसांचा पॅरोल मिळाला. मात्र तो फरार झाला आणि दिल्लीत आला. प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरू करण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र त्याआधीच तो पकडला गेला.