शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

एमआयडीसीतील हत्याकांडाची मास्टरमाइंड गजाआड प्रियकरासह पकडले; अमरावतीत मित्राकडे मुक्काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 21:16 IST

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी मिनू (वय १७) हिला तिच्या प्रियकरासह (वय १६) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी मिनू (वय १७) हिला तिच्या प्रियकरासह (वय १६) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले.

मृत विजयाबाई यांची मिनू ही नात होय. ती आणि तिचा प्रियकर हे दोघेही अल्पवयीन असल्याचे आज स्पष्ट झाले. विजयाबाई एसआरपीएफच्या निवृत्त कर्मचारी होत्या. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून तिघांचेही लग्न झाले आहे. हे तिघेही नागपुरातच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिवारासह राहतात. वृद्ध विजयाबाई सप्तक नगरात एकट्या राहायच्या. त्यांच्या मुलीची मुलगी मीनू स्वैर वागत होती. तिने आपल्या आईवडीलांचे घर सोडले होते. ती मित्रांसोबत राहायची. अधूनमधून आजी विजयाबाई यांच्याकडे यायची. आजी निवृत्त सरकारी कर्मचारी असल्याने तिच्याकडे १० ते १५ लाख रुपये आणि दागिने असल्याचा अंदाज मिनुने बांधला होता. ती एकटीच असल्याने तिचा गेम करून रोकड तसेच दागिने लुटता येईल, आजूबाजूला सीसीटीव्ही वगैरे काही नसल्याने आपले पाप कुणाच्या लक्षात येणार नाही, असे तनूला वाटत होते. आपले अवाजवी खर्च भागविण्यासाठी आजीची हत्या करण्याचा कुविचार तिच्या मनात आला. त्यानुसार तिने प्रियकर जान(नावात बदल)च्या मदतीने कट रचला. त्यात जानचे साथीदार नीलेश प्रकाश पौनीकर, बाबा उर्फ कदिर खान,  फरदीन खान आणि आरजू उर्फ मोहम्मद कमरे आलम यांना सहभागी करून घेतले. १० ते १५  लाख रुपये मिळणार म्हणून आरोपी त्यात वसहभागी झाले आणि गुरुवारी मध्यरात्री त्यांनी विजयाबाईच्या गळ्यावर    गुप्तीचे घाव घालून त्यांची हत्या केली. घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लुटून आरोपी पळून गेले. शुक्रवारी दुपारी हे हत्याकांड उघड झाल्यानंतर खुद्द पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त विवेक मासाळ यांनी व तपासावर लक्ष केंद्रित केले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनीही आपली पथके चौकशीसाठी कामी लावली. ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांच्या सहकार ऱ्यांनी विजयाबाई यांची नागपुरात राहणारी नात मीनू घरून गायब असल्याचे आणि ती वाममार्गावर असल्याचे कळाल्याने पोलिसांनी तिच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यानंतर शनिवारी रात्री बाबा, नीलेश पौनिकर आणि फरदीन खान तसेच आरजूला पकडण्यात आले. त्यांनी हत्येची कबुली दिली. दरम्यान, रोकड, दागिन्यांसह तमीनू तिचा प्रियकर जानसह फरार झाली.

औरंगाबादला जाणार होते

जान यापूर्वी अमरावतीला कामाला होता. तेथे त्याचे मित्र होते. आपले साथीदार पकडले गेल्याचे कळताच तनू आणि फैजान अमरावतीला मित्राकडे पळून गेले. जानची मावशी औरंगाबादला राहते. तिच्याकडे जाण्याची त्यांची तयारी होती. मात्र, गुन्हेशाखेच्या पथकाने आज पहाटे २ च्या सुमारास अमरावतीत जाऊन आरोपी फैजान तसेच मीनूला ताब्यात घेतले. आज पहाटे ५ वाजता त्यांना नागपुरात आणण्यात आले.सात दिवसांचा पीसीआरया खळबळजनक हत्याकांडाचा छडा लावून आरोपींना अटक करण्यासाठी एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सलग तीन दिवस धावपळ केली. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकांनीही मदत केली. आज मिनू आणि जान हाती लागल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. मीनू आणि जान वगळता अन्य चार आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कस्टडी मंजूर केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी