शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चार जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:57 IST

Crime News: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. २९ जुलैच्या रात्रीची ही घटना असून, शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे.

नागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एकाच रात्री दोन वेळा सामूहिक अत्याचार केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. २९ जुलैच्या रात्रीची ही घटना असून, शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. सीताबर्डी पोलिसांनी सूत्रधार ऑटोचालकासह चार आरोपींना अटक केली आहे. अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.पीडिता १७ वर्षीय अल्पवयीन असून गरीब कुुटुंबातील आहे. वहिनीने रागवल्याने ती २९ जुलै रोजी रात्री घराबाहेर पडली. मेडिकल चौकातून तिने एका ओळखीच्या ऑटोचालकाला सीताबर्डीला सोडण्यास सांगितले. त्याने तिला मानस चौकात सोडून दिले. तिथे दुसरा ऑटोचालक साना याची तिच्यावर नजर पडली. त्याने मदतीचा हात पुढे करून तिला ऑटोत बसविले व मोमिनपुऱ्यात घेऊन गेला. तिला दारू पाजली. एका खोलीत घेऊन गेला व तीन मित्रांना पुन्हा बोलावले. आरोपी सानासह अन्य तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा मेयो रुग्णालयासमोर सोडून दिले. तिथे दोन ऑटोचालकांची तिच्यावर नजर पडली. त्यांनीसुद्धा तिच्यावर अत्याचार केला व फरार झाले. ती मेयो रुग्णालय चौकात मदत मागत होती. दरम्यान, दोघांनी आपल्या गाडीवर तिला रेल्वे स्टेशनवर सोडून दिले.रात्री उशिरा जीआरपीच्या गस्त घालणाऱ्या पथकाला ती रेल्वे स्टेशनवर आढळली. त्यांनी तिला महिला बालगृहात पाठविले. तिथे बाल कल्याण समितीपुढे अत्याचार झाल्याचे तिने सांगितले. समितीच्या सूचनेनुसार जीआरपीने तिचा जबाब नोंदवून घेतला. 

दुसऱ्यांदा झाला अत्याचारपीडित मुलीवर यापूर्वीही सामूहिक अत्याचार झाला आहे. यापूर्वी तिच्यावर इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अत्याचार झाला होता. अनेक दिवस महिला बालगृहात राहिल्यानंतर ती घरी परतली होती; परंतु घरच्यांचा तिच्यासोबत नेहमीच वाद होत होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी