गेल्या काही दिवसांत कर्नाटक आणि बंगळुरू परिसरातून काही धक्कादायक गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. याचदरम्यान आता पुन्हा एकदा एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. स्त्रीयांच्या पीजीमध्ये एका मास्क घातलेल्या माणसाने शिरकाव करून दुष्कृत्य केले आहे. कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहणाऱ्या महिलांसाठी पीजीची सुविधा अतिशय सुरक्षित मानली जाते. पण, आता याच पीजीमध्ये गुन्हा घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुद्दगुंटेपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील महिला पीजीमध्ये एका पुरूषाने प्रवेश केला आणि तेथील एका तरुणीचा लैंगिक छळ केला. ही घटना २९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत सुद्दगुंटेपल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे . लैंगिक छळाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. २९ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजता एक व्यक्ती मास्क घालून पीजीमध्ये आला आणि मुलीच्या खोलीत घुसला. मुलीला कळले की, कोणीतरी तिच्या खोलीत शिरकाव केला आहे, पण तिला वाटले की, ती तिची रूममेट असावी. असा विचार करून ती झोपी गेली. त्यानंतर आरोपीने खोलीचा दरवाजा बंद केला आणि कुलूप लावले.
लैंगिक अत्याचार, मारहाण आणि पैसे घेऊन झाला पसार यानंतर आरोपीने मुलीकडे जाऊन तिचे हातपाय बांधले. जेव्हा मुलीला त्याच्या वागण्याबद्दल कळले तेव्हा तिने विरोध केला आणि ओरडून आरोपीला लाथ मारली. परंतु आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिला मारहाण केली. त्यानंतर त्याने कपाटातून २,५०० रुपये काढले आणि पळून गेला. मुलीने सुद्दगुंटेपल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलीस घेतायत आरोपीचा शोधआरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, आरोपी सुरक्षा तोडून पीजीमध्ये कसा घुसला या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. अलिकडेच, त्याच सुद्दगुंटेपल्यामध्ये एका तरुणाने मध्यरात्री एका मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि पळून गेला. आता, ही घटना पीजीमध्येही घडली आहे आणि आरोपी फरार आहे. यामुळे आता परिसरात खळबळ उडाली आहे.