शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीत असलेले चौकूट शस्त्रांसह  जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 21:40 IST

मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले आणि एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, दोन चॉपर, एक खेळण्यातील पिस्तुल, मोटारसायकल, मिरची पूड आदी साहित्य जप्त करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून ते कुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करीत असल्याचे उघड झाले आहे.

ठळक मुद्देकुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करणाऱ्या या आरोपींविराधात मुंबई ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.  रविवारी सायंकाळी बीआयटी चाळ, मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले मुंबई ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

मुंबई -  नागपाड्यातील व्यापाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या अट्टल चार गुन्हेगारांना नागपाडा पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. कुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करणाऱ्या या आरोपींविराधात मुंबई ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिटी सेंटर मॉलमधील काही व्यापारी दिवसभर केलेल्या व्यवसायाचे पैसे रात्री घरी घेऊन जात असत. अशा व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना लुटण्याचा कट काही अट्टल गुन्हेगारांनी आखल्याची गुप्त माहिती नागपाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे, पोलीस निरीक्षक विद्याधर काळकुंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक  संदेश मांजरेकर, पोलीस उपनिरीक्षक कदम, पाटील व पथकाने सापळा रचला. रविवारी सायंकाळी बीआयटी चाळ, मुंबई सेंट्रल येथे यातील आरोपी पोलिसांच्या नजरेस येताच त्यांना पोलिसांनी घेरले व चार जणांना ताब्यात घेतले आणि एकजण पळून जाण्यास यशस्वी ठरला. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, दोन चॉपर, एक खेळण्यातील पिस्तुल, मोटारसायकल, मिरची पूड आदी साहित्य जप्त करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून ते कुख्यात गुंड छोटा शकीलसाठी काम करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या विरोधात मुंबई ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न करणे, खंडणी मागणे आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.   

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसDacoityदरोडा