शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

निर्मलनगरमध्ये विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 03:25 IST

वांद्रे परिसरात एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यातच तिने हे पाऊल उचलले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुंबई - वांद्रे परिसरात एका विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिचा छळ केला, त्यातच तिने हे पाऊल उचलले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.वांद्रेच्या बेहरामपाडा परिसरात नौसिन एस. ही तिचा पती आणि सासरच्यांसोबत राहत होती. मात्र लग्न झाल्यापासून घरच्यांकडून तिला हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. याबाबत ती तिच्या घरच्यांना सांगायची. बुधवारी रात्री नौसिनने राहत्या घरी गळफास घेतला.याबाबत सासरच्यांनी पोलिसांना कळविले. निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नौसिनचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी पाठविला. नौसिनच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळी नौसिनच्या सासरच्यांनी मागितला तेवढा हुंडा दिला होता. मात्र त्यानंतरदेखील त्यांच्याकडून मुलीला त्रास देणे सुरूच होते.त्याच तणावात अखेर नौसिनने हे पाऊल उचलले असावे. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचे जबाब नोंदविले आहेत. या प्रकरणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती निर्मलनगर पोलिसांनी दिली.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी