शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी विवाहितेला जाळून मारले; लातूर जिल्ह्यात सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 12:32 IST

जयश्री हणमंत मुंडकर (२१) या विवाहितेला हुंड्यासाठी राहत्या घरी रॉकेल टाकून जाळून मारल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.

वाढवणा (लातूर) : चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील जयश्री हणमंत मुंडकर (२१) या विवाहितेला हुंड्यासाठी राहत्या घरी रॉकेल टाकून जाळून मारल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. याबाबत वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले, नायगाव तालुक्यातील मरवळी येथील जयश्रीचा विवाह २०१६मध्ये चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथील दयानंद हुलप्पा वागलगावे यांच्याशी झाला. लग्नानंतर सहा महिने जयश्रीला सासरच्यांनी चांगले नांदविले. मात्र, हुंड्यातील राहिलेल्या एक लाख रुपयांसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी शारीरिक, मानसिक छळ सुरु केला. यातूनच गुरुवारी मध्यरात्री  घरी अंगावर रॉकेल टाकून जयश्रीला पेटवून देण्यात आले. गंभीर भाजल्याने तिचा मृत्यू झाला. याबाबत विवाहितेचे काका उत्तम मारोती मुंडकर (३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाढवणा (बु.) पोलीस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी पती दयानंद वागलगावे, सासरा हुलप्पा वागलगावे, सासू हारुबाई वागलगावे, दीर पंढरी वागलगावे, नणंद उषा संजय म्हेत्रे, जावई संजय बळीराम म्हेत्रे आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पंडित शिरसे हे करीत आहेत.

राखी पौर्णिमेला दिली अंगठी  जयश्रीच्या वडिलांनी तीन लाख रुपये हुंडा, दोन तोळे सोने देऊन, रितीरिवाजाप्रमाणे २०१६ मध्ये राचन्नावाडी येथे लग्न लावून दिले होते. सहा महिने सुखाचा संसार चालला. एक मुलगी झाली. त्यानंतर हुंड्यातील राहिलेल्या एक लाख रुपयांसाठी जयश्रीचा छळ सुरु झाला. मुलीला चांगले नांदवा म्हणून जावयाला राखी पौर्णिमेला पाच ग्रॅमची अंगठीही दिली होती. मात्र, पैशाच्या मागे लागलेल्या सासरच्या मंडळींनी संगनमत करुन माझ्या मुलीचा घात केला, असा आरोप विवाहितेचे वडील हणमंत मुंडकर यांनी केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूWomenमहिलाdowryहुंडाlaturलातूर