शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ‘अवंतिका’मध्ये विवाहितेचा विनयभंग; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 08:51 IST

जीआरपीने रेल्वेकडून ज्या डब्यात ही घटना घडली त्या प्रवाशांची यादी मिळवली. त्यांनी अहमदाबादला जात असलेल्या पुरुषांना ओळखले आणि ताब्यात घेतले.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘अवंतिका’ एक्स्प्रेसमध्ये विवाहितेचा तिघांनी विनयभंग करत पतीला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी कुरिअर कंपनीत काम करणाऱ्या तिघांना अटक केली.

पीडित महिला पतीसोबत १० ऑक्टोबर रोजी मुंबईहून इंदूरला निघाली होती. त्यावेळी आरोपी बहादूरसिंग वाघेला (२८), नटवजी राजपूत (५५) आणि आनंद सोनी (३०) हे सर्व भुलेश्वर येथील रहिवासी पीडितेच्या विरुद्ध दिशेला असलेल्या सीटवर बसले होते. जीआरपीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्स्प्रेस बोरिवली स्थानकावर रात्री १० वाजता थांबली होती. त्यावेळी दारूच्या नशेत असलेल्या आरोपींपैकी एकाने महिलेचा खांदा दाबला आणि इतरांनी तिच्यावर अश्लील शेरेबाजी सुरू केली. याचा विरोध तिच्या पतीने केल्यावर आरोपीने त्यालाही शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी डब्यातील इतर प्रवाशांना याबाबत सांगितले. दुसऱ्या दिवशी म्हणजे ११ ऑक्टोबरला इंदूरला पोहोचल्यानंतर या जोडप्याने इंदूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार बोरिवली जीआरपीकडे वर्ग झाल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. 

जीआरपीने रेल्वेकडून ज्या डब्यात ही घटना घडली त्या प्रवाशांची यादी मिळवली. त्यांनी अहमदाबादला जात असलेल्या पुरुषांना ओळखले आणि ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपी कुरिअर कंपनीत काम करतात आणि अनेकदा कामासाठी फिरत असतात. घटनेनंतर काही दिवसांनी ते मुंबईत परतले. तर इंदूरमधील महिलेचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :railwayरेल्वे