शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

पतीशी वाद झाल्याने आंबोली घाटात उचलले टोकाचे पाऊल; अहमदनगरच्या महिलेला २०० फूट दरीतून वाचविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 11:51 IST

Amboli ghat news: मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने संजय पाटील नामक रिक्षाचालकाची रिक्षा सावंतवाडीला जायचे आहे, असे सांगून भाड्याने घेतली व ती सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी घाटात तिने रिक्षा थांबवाय़ला सांगितली.

सिंधुदुर्ग: आंबोली घाटाच्या (Amboli ghat) खोल दरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या कमल रामनाथ इंडे (२५),  हिने पती बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आपण हा टोकाचा निर्णय घेतला, अशी कबुली तिने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, दरीत पडल्यामुळे तिच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. तसेच एक पाय फॅक्चर आहे. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलीस निरिक्षक सचिन हुंदलेकर यांनी सांगितले. (Married women of Ahmednagar Tried to suicide at Amboli Ghat. Rescued from 200 feet deep)

मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आंबोली बसस्थानकावरून एका युवतीने संजय पाटील नामक रिक्षाचालकाची रिक्षा सावंतवाडीला जायचे आहे, असे सांगून भाड्याने घेतली व ती सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. दरम्याने घाटात तिने दरड पडलेल्या ठिकाणी रिक्षा थांबवली व घाटातील नजारा बघावा म्हणून ती घाटातील संरक्षक कठड्यावर चढली. हे बघताच रिक्षाचालकाने तिला खाली उतरण्याची विनंती केली. परंतु तितक्यात तिने चप्पल व ओढणी संरक्षक कठड्यावरच ठेवून खाली उडी मारली. ती जवळपास दोनशे फूट खाली कोसळली हे बघून घाबरलेल्या स्थितीत रिक्षा चालक आंबोली पोलिस स्टेशनला आला. त्यांनी घडलेली घटना आंबोली पोलिसांना सांगितली.

 त्यानंतर आंबोली पोलिस स्थानक प्रमुख बाबु तेली, दत्तात्रय देसाई व आंबोली मधील रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते आपत्कालीन व्यवस्थापन कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले व त्यांच्या अथक प्रयत्नानंतर तिला प्रतिकूल परिस्थितीत पाऊस वादळ वारा धोके असतानाही जिवंत व सुखरूप बाहेर काढले. तत्काळ तिला 108 रुग्णवाहिका मधून आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नेण्यात आले.

 पोलीस निरीक्षक सावंतवाडी सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलिस निरिक्षक तोसिफ्र सय्यद, पोलीस पोलीस उपनिरीक्षक आनंद यशवंते आदी उपस्थित होते. तर आपत्कालीन बचाव समितीतर्फे ही कामगिरी विशाल बांदेकर, अजित नार्वेकर, उत्तम नार्वेकर, संतोष पालेकर, राकेश अमृतकर, अमरेश गावडे, दीपक मिस्त्री, हेमंत नार्वेकर, मायकल डिसोजा यांनी पार पाडली.

टॅग्स :Amboli hill stationआंबोलि हिल स्टेशनPoliceपोलिस