शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

अनैतिक संबंधातून विवाहितेची निघृण हत्या; पहाटे पती कामावरून घरी परतला तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 08:33 IST

एकाच ठिकाणी काम करत असताना शहा आणि सुनमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले

मुंबई : विक्रोळीत अनैतिक संबंधातून विवाहितेची निघृण हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी अथक प्रयत्न करत बिहारच्या हनासा शफिक शहा (२५) याला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

सुनम सूरजलाल माताफेर (३७) असे मृत महिलेचे नाव असून, त्या विक्रोळी पूर्वेकडील मच्छी मार्केट परिसरात राहण्यास होत्या. त्यांचे पती सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी शहा हा धारावीत राहण्यास असून, मूळचा बिहारचा रहिवासी आहे. सोमवारी सुनम या घरात एकट्या असताना आरोपीने घरात प्रवेश करत त्यांची गळा चिरून हत्या केली. सकाळी पती कामावरून घरी परतल्यानंतर सुनम रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्याने खळबळ उडाली. त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले.

मात्र, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली. घटनास्थळी मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन, डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट घेणाऱ्यांकडून पुरावे गोळा करणाऱ्यांनीही शोध सुरू केला. घटनास्थळावरील पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणावरून पोलिस शहापर्यंत पोहोचले. त्याला ताब्यात घेत चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

म्हणून काढला काटाएकाच ठिकाणी काम करत असताना शहा आणि सुनमची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यातूनच सुनमने लग्नासाठी तगादा लावला. यावरून दोघांमध्ये वाद होत असत. सोमवारी रात्री पती कामावर गेल्यानंतर शहा घरी आला. लग्नावरून दोघांमध्ये वाद झाले. यातूनच त्याने सुनमची गळा चिरून हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली.

असा आला आरोपी जाळ्यातघटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली दहा तपास पथके स्थापन करून आरोपींचा शोध सुरू केला. पुढे तांत्रिक पुराव्याच्या मदतीने पथकाने अवघ्या काही तासांत गुन्ह्याची उकल करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी