शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

2 राज्यात 2 बायका ठेवण्याचं तरुणाचं स्वप्न भंगलं; पळून जाताना नातेवाईकांनी पकडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2023 16:45 IST

तरूण विवाहित असून त्याला दोन वर्षांची मुलगीही असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन राज्यात वेगवेगळ्या बायका ठेवण्याचे स्वप्न बिहारच्या जमुई येथील एका तरुणाला महागात पडलं आहे. हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडसोबत भोपाळला निघाला होता, मात्र गर्लफ्रेंडच्या नातेवाईकांनी त्याला रेल्वे स्टेशनवर पकडलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलीस कारवाई करत आहेत. तरूण विवाहित असून त्याला दोन वर्षांची मुलगीही असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झाझा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या विनोदची गेल्या वर्षी एका जत्रेत एका मुलीशी ओळख झाली. तेथून दोघांमध्ये प्रेमसंबंध झाले. दोघांनी मोबाईल नंबर शेअर केले आणि संभाषण सुरू झाले. तरुणाने तरुणीला लग्न करण्याचे आश्वासन दिले. नुकताच विनोद भोपाळहून त्याच्या गावी आला होता. याच दरम्यान दोघांनी मिळून पळून जाण्याचा बेत आखला.

तरुणीने सांगितले की, विनोद विवाहित असल्याचे मला माहीत होते. असे विचारले असता विनोदने सांगितले की, सुरुवातीला काही महिने भोपाळमध्ये ठेवणार होता, नंतर बिहारला आणणार आणि दोन्ही पत्नींना सोबत ठेवणार होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळाली. झाझा रेल्वे स्थानकातून दोघांना पकडून बेदम मारहाण केली. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

विनोदने पोलिसांना सांगितले की, दोघेही एकमेकांना ओळखतात. तो म्हणाला की, मी भोपाळला गेल्याची बातमी ऐकून मुलगी स्वतः माझ्या मागे लागली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली. यादरम्यान तरुणाची पत्नी आपल्या मुलीसह खैरा पोलीस ठाण्यात आली आणि पतीला सोडण्याची विनंती करत होती. काहीही झालं तरी चूक समजून माफ करा आणि नवऱ्याला सोडून द्या, अशी विनवणी पत्नी करत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी