शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या चाेरट्याला लातूर पाेलिसांकडून अटक; १९ दुचाकी जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 18:07 IST

पुणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, बीडमध्ये होता वावर

लातूर : पुणे, औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून माेटारसायकली पळवून त्या दाेन-चार हजारात विक्री करणाऱ्या परळी वैजनाथ येथील अखिल महेबूब शेख याला लातूर पाेलिसांनी पकडलं. त्याच्याकडून १९ दुचाकी जप्त केल्या असून, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पाेलिसांच्या हाती लागला आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी घडलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी पाेलीस पथकाला आदेश दिले हाेते. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विवेकानंद चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने आराेपीचा शाेध सुरु केला. तर २८ मार्च राेजी लातुरातील विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला हाेता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे परळी वैजनाथ येथील अखिल महेबूब शेख (३४) याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

त्याची अधिक चाैकशी केली असता, एमआयटी महाविद्यालयाच्या पार्किंगमधील मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. अधिक चाैकशी करत खाक्या दाखवताच लातूर शहर, उदगीर, माळाकोळी (ता. लाेहा, जि. नांदेड), अंबाजोगाई, बीड, औरंगाबाद, उस्मानाबाद, शिक्रापूर, पुणे येथून मोटरसायकली चाेरल्याचे त्याने सांगितले. चाेरीतील १९ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस उपनिरीक्षक जिलानी मानूला, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गोणारकर, सहायक फौजदार बुड्डे-पाटील, वाहिद शेख, रामचंद्र ढगे, पोलीस अमलदार मुन्ना पठाण, संजय कांबळे, रामलिंग शिंदे, दयानंद सारोळे, महेश पारडे, विनोद चलवाड, खंडू कलकत्ते, रमेश नामदास, अशाेक नलवाड, नारायण शिंदे यांचा यांच्या पथकाने केली.

दाेन-चार हजारांत विक्री...लातूर, औरंगाबाद, पुणे, उस्मानाबाद, बीड आणि नांदेड जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून पळविण्यात आलेल्या माेटारसायकली केवळ दाेन ते चार हजार रुपयांत विक्री करण्यात आल्याची माहिती समाेर आली आहे. केवळ खर्चा-पाण्यासाठी अखिल शेख याने या माेटारसायकली चाेरल्याचे पाेलिसांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून ताे एकटाच माेटारसायकल चाेरी करत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरBeedबीड