शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसा मनवेलपाड्यात एकाच वेळी चार घरफोड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 21:12 IST

या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात काही अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत चोरटयांनी सोने- चांदी, मौल्यवान वस्तूसह चारपैकी दोन घरातील रोख रक्कमही लंपास केली असल्याने या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने पोलिसांच्या नाकाबंदी व गस्तीपथकाबाबतच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

वसई – ऐन गणपती उत्सवात विरार पूर्वेला भरदुपारी चोरट्यांनी मच्छिमार हाऊसिंग सोसायटीतील तळमजल्यावर असलेली चार घरे एकाच वेळी फोडल्याने मनवेलपाडा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात काही अज्ञातांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीत चोरटयांनी सोने- चांदी, मौल्यवान वस्तूसह चारपैकी दोन घरातील रोख रक्कमही लंपास केली असल्याने या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने पोलिसांच्या नाकाबंदी व गस्तीपथकाबाबतच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

 विरार पूर्वेच्या मनवेलपाडा परिसरात राहणारे फिर्यादी राकेश जगन्नाथ तरे (वय 47) हे मच्छिमार हौसिंग सोसायटी,रूम नं.02 येथे राहतात. मात्र, ते गणपती दर्शनासाठी गुरुवार दि.14 रोजी आपले अर्नाळा येथील काकांच्या घरी गेले होते. तेथून जेवण आटपून ते दुपारी 3 वाजताच्या सुमारास मनवेलपाड्यात घरी आले असता त्यांना आपल्या घराचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावेळी भयभीत झालेल्या तरे यांनी आपल्या घरात गेल्यावर त्यांना घरातील सर्व वस्तू व लोखंडी कपाट फोडून त्यातील लाखोंचे सोने -चांदी व रोख रक्कम नेल्याचे समजले. त्याचवेळी बाजूला चौकशी केल्यावर इतर तीन रूमची हि कुलूपे तोडली असल्याचे दिसले.तर यामध्ये दुसऱ्या रूममधील जितेंद्र दवणे यांचे हि घर फोडून त्यांच्या घरातील केवळ सहा हजार रुपये चोरीस गेले आहेत. मात्र, राकेश तरे यांचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचे सोने चांदी वस्तू सहित रोख रक्कम चोरटयांनीं लंपास केल्याने फिर्यादी तरे यांनी लागलीच विरार पोलीस  ठाण्यात धाव घेत अज्ञातांवर घरफोडीच्या गुन्हा दाखल केला आहे.  आश्चर्य म्हणजे ऐन गणपती उत्सवात व संबंध वसई विरारमध्ये सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना चोरट्यांनी तरे यांच्या घरातून लाखोंची जमा पुंजी लंपास केल्याने तरे कुटुंब व इतर शेजारी हवाल दिल झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyदरोडा