शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

जेसिका लाल हत्येतील दोषी मनू शर्माची वेळेआधी तुरुंगातून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2020 20:55 IST

या बैठकीत 37 कैद्यांची प्रकरणे ठेवली गेली. यापैकी 22 कैद्यांना शिक्षेच्या कालावधीआधी सुटका करण्याचे मान्य केले होते. अंतिम निर्णय उपराज्यपालांकडे सोडण्यात आला होता.

ठळक मुद्दे चांगल्या वर्तणुकीमुळे मनुला जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी तुरूंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याने पॅरोल व फर्लोही प्राप्त केले आहे. त्यात तो वेळेवर परत तुरूंगात आला आहे. त्याचबरोबर तुरूंगात असतानाही त्याने चांगले वर्तन केले आहे.

नवी दिल्ली - बहुचर्चित जेसिका लाल हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या मनु शर्मा याला तुरुंगातून मुदतपूर्वी सोडण्यात आले आहे. शर्माला सोमवारी तिहार तुरूंगातून सोडण्यात आले. शर्मासह अन्य 18 कैद्यांना वेळेअगोदर सुटका करण्याच्या आदेशाला उपराज्यपाल अनिल बैजल यांनी मंजुरी दिली होती. तिहार तुरूंगात कैद्यांच्या ठोठावलेल्या शिक्षेच्या कालावधीआधीच मुक्तीसाठी सेंटेंस रिव्यू बोर्डाची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत 37 कैद्यांची प्रकरणे ठेवली गेली. यापैकी 22 कैद्यांना शिक्षेच्या कालावधीआधी सुटका करण्याचे मान्य केले होते. अंतिम निर्णय उपराज्यपालांकडे सोडण्यात आला होता.चांगल्या वर्तणुकीमुळे मनुला जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी तुरूंगातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मनुनेही 17 वर्षांची शिक्षा ठोठावली. यापूर्वी मनुची केस आणखी पाच वेळा एसआरबीमध्ये ठेवली गेली होती. प्रत्येक वेळी मनुचे प्रकरण पुढच्या बैठकीसाठी पुढे ढकलण्यात आले होते. हे कैदी किमान 14 वर्षे तुरूंगात आहेत, असे बोर्डाकडून सांगण्यात आले. दरम्यान, त्याने पॅरोल व फर्लोही प्राप्त केले आहे. त्यात तो वेळेवर परत तुरूंगात आला आहे. त्याचबरोबर तुरूंगात असतानाही त्याने चांगले वर्तन केले आहे.

 

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी आज करणार आरोपपत्र दाखल, आपचा नगरसेवक देखील आरोपी

 

विकृत! लॉकडाऊनदरम्यान बापाने १३ वर्षीय मुलीवर केला बलात्कार, सावत्र आईने गाठले पोलीस स्टेशन  

१९९९ मध्ये जेसिकाची हत्या झाली२० एप्रिल १९९९ रोजी तत्कालीन कॉंग्रेसचे प्रभावी नेते विनोद शर्मा यांचा मुलगा मनु शर्मा याला दिल्ली बारमध्ये जेसिकाची गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.डिसेंबर २००६ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात मनु शर्माला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शर्मा कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि एप्रिल २०१० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. मनु व्यतिरिक्त उपराज्यपाल अनिल बैजल यांनीही जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 18 जणांना सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :MurderखूनjailतुरुंगCourtन्यायालय