शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren: मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आणखी दोघांना अटक; आतापर्यंत ७ जणांना बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 09:09 IST

आतापर्यंत चार पोलिसांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार वाझे, रियाजुद्दीन काझी व निरीक्षक सुनील माने या तिघांची बेशिस्त व गैरकृत्याबाबत पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई पोलीस दलासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिलेल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आणखी दोघांना अटक केली आहे. संतोष आत्माराम शेलार व आनंद पांडुरंग जाधव अशी त्यांची नावे असून, दोघे मालाडमधील कुरार व्हिलेज परिसरात राहणारे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेच्या सांगण्यावरून ते या कटात सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी आतापर्यंत चार पोलिसांसह एकूण ७ जणांना अटक करण्यात आली आहे. मुख्य सूत्रधार वाझे, रियाजुद्दीन काझी व निरीक्षक सुनील माने या तिघांची बेशिस्त व गैरकृत्याबाबत पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर कॉन्स्टेबल विजय शिंदेला लखन भय्या एन्काउंटर प्रकरणात यापूर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे.प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया निवासस्थान असलेल्या कारमायकल रोड परिसरात जिलेटीनच्या कांड्या असलेली स्कार्पिओ २४ फेब्रुवारीला पार्क करण्यात आली होती. 

त्या कटात वाझेसह सहभागी असलेले ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची ४ मार्चला हत्या करण्यात आली हाेती. याबाबत काझी व सुनील माने यांच्यासह पाच जणांना एनआयएने अटक केली. त्यांच्याकडील चौकशीतून संतोष शेलार व आनंद चव्हाणचा शोध सुरू होता. अखेर त्यांना अटक करण्यात आली. 

हत्येवेळी गाडीत असल्याचा संशय!nफरार असलेले दोघे उपनगरात एका ठिकाणी आल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सोमवारी त्या ठिकाणी छापा मारून अटक केली. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता २१ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली. nवाझेच्या सूचनेनुसार दोघे मनसुख यांच्यावर पाळत ठेवून होते. हत्येवेळी ते गाडीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरण