शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

Mansukh Hiren death case : एनआयएने नाेंदविले ४० हून अधिक जणांचे जबाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 05:48 IST

Mansukh Hiren death case: एनआयए या प्रकरणाचा तपास आठ मार्चपासून करीत आहे. त्यामध्ये पहिले १० दिवस स्फोटक कार प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता.

मुंबई : उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटक कार व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आतापर्यंत ४० जणांहून अधिक जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह हॉटेल मॅनेजर, नंबर प्लेट दुकान चालकाचा समावेश आहे, तर या प्रकरणात वाझेसह चौघांना अटक करण्यात आली आहे.एनआयए या प्रकरणाचा तपास आठ मार्चपासून करीत आहे. त्यामध्ये पहिले १० दिवस स्फोटक कार प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे होता. त्यामध्ये निलंबित एपीआय सचिन वाझे हाच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला १३ मार्चला अटक झाली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याचा मित्र व ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांची त्याने हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तो गुन्हाही एनआयएकडे वर्ग करण्यात आला. महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या महिनाभरात विविध अंगांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. त्यामध्ये आतापर्यंत संबंधित ४० जणांची कसून चौकशी करून जबाब घेतले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत आयुक्तालय, चारकामरान रोड, तसेच मुंबई, ठाणे येथील प्रमुख मार्ग, टोल नाके, वाझे राहत असलेल्या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी  केली आहे. त्यातून अनेक बाबी उघडकीस आल्या आहेत.

- आतापर्यंत याप्रकरणात माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह हॉटेल मॅनेजर, नंबर प्लेट दुकान चालक यांचा जबाब नाेंदवण्यात आला. तर, सचिन वाझेसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा