शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

Mansukh Hiren Case : मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 17:13 IST

Mansukh Hiren's Lawyer's statement about Sachin vaze : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारा धक्कादायक गौप्यस्फोट मनसुख हिरेन आणि कुटुंबीयांचे वकील गिरी यांनी केला आहे. 

मुंबई  - अंबानींच्या घराशेजारी सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली आहे. (Mansukh Hiren Case) त्यात या मृत्यूबाबत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आरोप झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. (Mansukh Hiren's Lawyer's statement about Sachin vaze ) त्यातच आता या प्रकरणाला नवे वळण देणारा धक्कादायक गौप्यस्फोट मनसुख हिरेन आणि कुटुंबीयांचे वकील गिरी यांनी केला आहे. (Mansukh Hiren's lawyers big claim about relation between Mansukh Hiren & Sachin Waze )

मनसुख हिरेन यांना सल्ला देणारे वकील गिरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मनसुख हिरेन यांची गाडी १७ फेब्रुवारीला चोरीला गेली होती. १८ तारखेला त्यांनी विक्रोळी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर ही गाडी अंबानींच्या घराशेजारी स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांच्यामागे पोलीस आणि माध्यमांचा ससेमिरा लागला होता. त्यामुळे हिरेन यांनी माझ्याकडून याबाबत कायदेशीर सल्लाही घेतला होता. 

मनसुख हिरेन यांना झालेल्या त्रासाबाबत त्यांच्या वकिलांनी सांगितले की,  दर एक दोन तासांनी कुठून ना कुठून पोलीस यायचे, प्रश्नांची सरबत्ती केली जायची. कुटुंबीयांना झोपू दिले जात नसे. प्रसारमाध्यमांकडूनही विचारणा व्हायची. त्यामुळे मनसुख हिरेन आणि त्यांचे कुटुंबीय त्रस्त होते. मात्र सचिन वाझेंबाबत त्यांनी मला काही सांगितले नव्हते. उलट सचिन वाझे हे आपले मित्र आहेत. त्यांना माझी मदत करायची आहे, असे त्यांनी मला सांगितले होते, असा दावा हिरेन यांचे वकील गिरी यांनी केला. 

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘ॲन्टिलिया’ निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येशी निगडित महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकासह (एटीएस) रोज वेगवेगळ्या यंत्रणांकडून, च्च पातळीवर तपास करत आहे. त्याच अनुषंगाने हिरेन यांच्या कुटुंबीयांना रोज वेगवेगळ्या चौकशींना सामोरे जावे लागत असल्यामुळे हे कुटुंब हैराण झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.दुसरीकडे मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी वादग्रस्त एपीआय सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसPoliticsराजकारण