शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र मृतदेहासाेबत नग्न हाेऊन काढली छायाचित्रे, साने याने गाठला वासनांधतेचा कळस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 06:52 IST

साने याने सरस्वतीपासून लैंगिक आजाराची माहिती लपवली हाेती. त्याचे अन्य महिलांशी चालणारे चॅटिंग, पॉर्न व्हिडीओ बघणे आदीपैकी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.

मीरा रोड : सरस्वती हत्याकांडातील आरोपी मनोज साने (५६) हा वासनांध असून सरस्वतीचे तुकडे करण्याआधी तिच्या विवस्त्र मृतदेहासोबत त्याने स्वतः नग्न होऊन छायाचित्रे काढली. नंतर त्याने पॉर्न व्हिडीओ पाहिल्याचे पाेलिस तपासात उघड झाले आहे. साने याने सरस्वतीपासून लैंगिक आजाराची माहिती लपवली हाेती. त्याचे अन्य महिलांशी चालणारे चॅटिंग, पॉर्न व्हिडीओ बघणे आदीपैकी कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत.सरस्वतीची हत्या आपण केली नाही तर तिने विष पिऊन आत्महत्या केली, असे साने हा पोलिसांना सातत्याने सांगत आहे; मात्र कीटकनाशक हे साने यानेच बोरिवलीच्या बाभई येथील आदर्श नर्सरीतून खरेदी केले हाेते. त्याच्या घरात सापडलेली कीटकनाशकाची बाटली ही त्याच दुकानातून खरेदी केल्याचे बाटलीवरील बॅच क्रमांकावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साने यानेच सरस्वतीला विषारी द्रव्य देऊन मारल्याची दाट शक्यता आहे.मनोज साने याने ४ जूनला सरस्वतीची हत्या केल्यानंतर पोलिसांना पुरावे सापडू नये म्हणून प्लास्टिक पिशवीत भरलेले तुकडे पिशवीसह न टाकता ते पिशवी उघडून टाकणार होता. अशा पद्धतीने ताे मृतदेहाची विल्हेवाट लावणार होता. त्यात तो यशस्वी झाला असता तर सरस्वतीच्या निर्घृण हत्याकांडाचा थांगपत्ता लागला नसता; मात्र शेजारी राहणाऱ्या तरुणास ६ जूनला साने याच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले आणि त्याने नयानगर पोलिसांना कळवल्याने हे हत्याकांड उघड झाले.

मनोवैज्ञानिक चाचणी आरोपी साने याने कटकारस्थान करून सरस्वती वैद्य हत्याकांड घडवून आणले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. तो पोलिसांना तपासात सहकार्य न करता दिशाभूल करणे, खोटी माहिती देणे आदी प्रकार करत आहे. त्यामुळे पोलिसांनी साने याची मुंबईच्या जेजे रुग्णालयात गुरुवारपासून मनोवैज्ञानिक चाचणी सुरू केली आहे. गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस चाचणी झाली असून आता सोमवारी पुन्हा चाचणीसाठी नेण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी