शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

नागपूरच्या  मानकापूर हत्याकांडातील आरोपीला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:25 PM

क्षुल्लक कारणावरून नातेवाईक तरुणाची हत्या करणारा आरोपी शेरा उर्फ विकी महतो (वय ४६) याला न्यायालयात हजर करून मानकापूर पोलिसांनी त्याची १६ जानेवारीपर्यंत कोठडी मिळवली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षुल्लक कारणावरून नातेवाईक तरुणाची हत्या करणारा आरोपी शेरा उर्फ विकी महतो (वय ४६) याला न्यायालयात हजर करून मानकापूर पोलिसांनी त्याची १६ जानेवारीपर्यंत कोठडी मिळवली. आरोपी शेराने रविवारी रात्री ८ च्या सुमारास त्याचा नातेवाईक आनंद ललित खरे (वय ४५) याची क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर चाकूने भोसकून हत्या केली होती.झिंगाबाई टाकळीजवळच्या मराठी शाळेजवळ नाल्याच्या काठावर आनंद एका झोपडीत त्याची वृद्ध आई आणि १२ वर्षीय मुलासह राहत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, तो संशयी आणि सणकी स्वभावाचा होता. छोट्या छोट्या कारणावरून वाद घालून लगेच भांडणावर येत असल्यामुळे आनंदचे आजुबाजुच्यांसोबत फारसे पटत नव्हते. त्याच्या याच स्वभावामुळे त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती. १२ वर्षांचा मुलगा आणि वृद्ध आईसोबत तो राहायचा. मोलमजुरी करून तो पोट भरत होता. रविवारी रात्री ९ च्या सुमारास तो बाहेरून घरी परतला. यावेळी त्याला घराजवळ शेरा बसून दिसला. त्यामुळे आनंदने त्याला ‘तू माझ्या घराजवळ कशासाठी बसला‘, असा प्रश्न केला. त्यावरून या दोघांमध्ये बाचाबाची आणि हाणामारी झाली. एकमेकांना मारहाण केल्यानंतर आनंद त्याच्या झोपड्यात गेला. त्याने आतून भाजी कापण्याचा सत्तूरसारखा चाकू आणला. त्याने शेरावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेराने आनंदच्या हातातील चाकू हिसकावून आनंदवरच सपासप घाव घातले. आरडाओरड ऐकल्यानंतर आनंदची आई आणि शेजारी धावले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आनंदला मेयोत नेले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच मानकापूरचे ठाणेदार वजिर शेख त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. तणाव निर्माण होत असल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस बळ मागवून घेण्यात आले. पोलीस उपायुक्त विनीता शाहू आणि सहायक आयुक्त रेखा भोवरे यांनीही मानकापूर ठाणे गाठले. रिना राजेश मातेलकर (वय ३५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी शेराला पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करून त्याची १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळवली.निराधार झाली आई अन् मुलगाआनंदच्या हत्येमुळे त्याची वृद्ध आई आणि छोटा मुलगा निराधार झाला आहे. आनंद या दोघांचा एकमात्र आधार होता. त्याच्याचमुळे घरात चूल पेटायची. क्षुल्लक कारणावरून त्याची हत्या झाल्याने आजी-नातवावर उपासमारीची पाळी आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनArrestअटक