शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या सनरूफमध्ये उभा असताना मांजाने गळा कापला; आईच्या मांडीवर गेला चिमुकल्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 07:06 IST

गळा कापल्याने आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला. 

मनोर (जि. पालघर) :

हमरापूर-गाळतरे रस्त्यावरून जाणाऱ्या एका कारच्या सनरूफमधून आठवर्षीय चिमुकला उभा राहून हिरवेगार डोंगर, शेतीचे दृश्य बघत असताना अचानक त्याच्या गळ्यावर पतंगाचा मांजा आल्याने त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली. गळा कापल्याने आणि रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने रुग्णवाहिकेतच त्याचा मृत्यू झाला. मुंबईतील कांदिवली येथून रविवारी दिशान तिवारी, त्याचे आजी-आजोबा, आई-वडील, बहीण हे हमरापूर गाळतरे येथे फिरण्यास आले होते. ते संध्याकाळी कारमध्ये फिरत असताना दिशान कारचे सनरूफ उघडून उभा राहून निसर्ग पाहत होता. अचानक पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्यात अडकला. त्याचा गळा कापला गेल्याने मोठी जखम झाली. त्याला नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले; परंतु रक्तस्राव व गळ्याची नस कापल्यामुळे त्याची प्रकृती अतिगंभीर होत गेली. पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेत असताना आई-वडिलांच्या मांडीवरच त्याची प्राणज्योत मालवली.पतंगाच्या मांजामुळे कापला हॉटेल व्यावसायिकाचा गळापुण्यात मोटरसायकलवरून जात असताना रस्त्यात आलेल्या पतंगाच्या मांजामुळे एका हॉटेल व्यावसायिकाचा गळा कापला गेला. श्रीकांत लिपाणे (वय २७) असे  त्याचे नाव असून वारजे येथील ढोणेवाडाजवळ रविवारी दुपारी हा प्रकार घडला. श्रीकांत लिपाणे हे मोटरसायकलवरून आईला घेऊन पुनावळे येथून जांभुळवाडीकडे सर्व्हिस रोडने जात होते. ढोणेवाडाजवळ रस्त्यावर अर्धवट लटकलेल्या पतंगाच्या मांजामुळे त्यांचा गळा कापला. लोकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती सुधारत आहे. याप्रकरणी निखिल गोपीनाथ लिपाणे (जांभुळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी