शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

मांडुळ सापाची तस्करी, मुक्ताईनगर येथील दोघे गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 20:16 IST

Mandul Snake Smuggling : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अमरावती सेलची कारवाई 

ठळक मुद्देसदर प्रकरणाचा तपास हिवरखेड फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण हे करत आहेत.याप्रकरणात आणखी नऊ लोकांचा सहभाग असल्याचे दिसुन आलेले आहे. अटक आरोपीस १३ आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी मिळालेली आहे.                     अमोल महादेव हिवराळे  (२८) व लक्ष्मण उर्फ सोनु राजु खिरोळकर  (२२, दोघेही रा. वडोदा, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

परतवाडा (अमरावती) : मांडुळ या सापाची तस्करी करणाऱ्या दोघांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पच्या अमरावती येथील सायबर क्राईम सेलने  शनिवारी अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या जळगाव येथे अटक  केली. या घटनेने पुन्हा एकदा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात मांडुळ सापाची तस्करी प्रकरण उघडकीस आले आहे. शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता दोघांना अटक करण्यात आली. तर, जवळपास सात आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.             

अमोल महादेव हिवराळे  (२८) व लक्ष्मण उर्फ सोनु राजु खिरोळकर  (२२, दोघेही रा. वडोदा, ता. मुक्ताईनगर जि. जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. १० आॅक्टोंबर रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावतीच्या सायबर क्राईम सेलला मौजा जळगावजवळील  दोन व्यक्ती  मांडूळ  सापाची तस्करी करुन विक्रीची तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मेळघाट व्याघ्र प्रकल्प सायबर क्राईम सेलचे अधिकारी आणि अकोट वन्यजीव विभाग अकोटमधील अधिकाऱ्यांंनी सापळा रचला. हिवरखेड येथील एका पेट्रोल पंपाजवळ शनिवारी सायंकाळी  आरोपी  अमोल हिवराळे व  लक्ष्मण (सोनु) राजु खिरोळकर यांना अटक करण्यात आली. त्यांचेकडून मांडुळ या प्रजातीचा साप आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणात आणखी नऊ लोकांचा सहभाग असल्याचे दिसुन आलेले आहे. अटक आरोपीस १३ आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी मिळालेली आहे.                   

सदर प्रकरणाचा तपास हिवरखेड फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ चव्हाण हे करत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्यवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक  एस. नवकिशोर,  विभागीय  वनाधिकारी  मनोज खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे, अकोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण पाटील यांच्यासह वनरक्षक आकाश सारडा आर.जे. आडे, आर. आर. ठवकर, बळीराम सरकटे, अतीफ हुसेन, एन.बी.अंभोरे या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Smugglingतस्करीPoliceपोलिसforest departmentवनविभागPoliceपोलिसArrestअटक