शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांचा सश्रम कारावास

By धीरज परब | Updated: January 25, 2025 13:18 IST

मीरारोड भागातील एका ८ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला ठाणे न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

मीरारोड - मीरारोड भागातील एका ८ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीला मारण्याची धमकी देऊन तिच्यावर सातत्याने बलात्कार करणाऱ्या ५६ वर्षीय आरोपीला ठाणे न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ हजारांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

मीरारोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका ८ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन वकील अहमद सगीर हसन शेख ( वय ५६ वर्षे ) याने तिच्यावर वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केला. तिला मारण्याची धमकी देऊन तो सतत तिच्यावर अत्याचार करत होता. 

मुलीच्या कुटुंबियांना सदर प्रकार समजल्यावर १० एप्रिल २०२१ रोजी नया नगर पोलीस ठाण्यात पॉक्सो व बलात्कारचा गुन्हा दाखल करण्यात येऊन शेख ह्याला अटक केली होती . या प्रकरणी तत्कालीन पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपनिरीक्षक सुनील साळुंखे, हवा. निशांत दरेकर यांनी तपास करून आवश्यक पुरावे गोळा केले होते. 

त्या नंतरचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी, विलास सुपे व आताचे अमर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव इंगवले यांनी न्यायालयात पैरवी केली. तर सहायक फौजदार सुपडू तडवी, अंमलदार शैलेश साबळे व नीरज घोडेकर यांनी समन्स बजावणी व साक्षीदारांना वेळोवेळी साक्षकामी न्यायालयात हजर ठेवण्यासाठी काम केले. 

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ठाणेच्या न्यायाधीश व्हि.  एल.  भोसले यांनी आरोपी शेख ह्याला दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व  १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी अभियोक्ता म्हणून चंदणे यांनी आरोपी विरुद्ध प्रभावी बाजू मांडली. मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक आयुक्त विवेक मुगळीकर यांचे पोलिसांना मार्गदर्शन मिळाले. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी