शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी धर्म बदलला, इशरतची बनली सोनी; जिवापाड प्रेम केलं त्यानेच संपवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2022 13:54 IST

पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक करत जेलमध्ये पाठवलं आहे.

लखनऊ- मडियाव येथे राहणारी इशरत परवीननं प्रेमासाठी धर्म बदलला अन् आयुष्यभर साथ निभावण्याचं वचन देत सोनी तिवारी बनली. परंतु तिला थोडीही भनक नव्हती ज्या पुष्पेंद्र तिवारीवर तिने जिवापाड प्रेम केले तोच एकदिवस तिच्या मृत्यूचं कारण बनेल. पुष्पेंद्रनं २ साथीदारांच्या सहाय्याने सोनीचा काटा काढला. त्यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने फिल्मीस्टाइल बनाव रचला मात्र पोलिसांच्या हुशारीनं तो त्यानेच बनवलेल्या जाळ्यात अडकला. 

पोलिसांनी या प्रकरणी ३ आरोपींना अटक करत जेलमध्ये पाठवलं आहे. माहितीनुसार, मसकनवा येथील पुष्पेंद्र तिवारी उर्फ शुभम २०१९ मध्ये जीम ट्रेनर म्हणून काम करत होता. ज्याठिकाणी इशरत परवीन नेहमी यायची. प्रशिक्षणावेळी दोघांमध्ये ओळख झाली त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. काही दिवसांनी पुष्पेंद्र मॉडेल बनण्यासाठी मुंबईला आला. त्याच्यानंतर इशरतही मुंबईत पोहचली. धर्म बदलून इशरतनं पुष्पेंद्रसोबत लग्न केले. लग्नाच्या ६ महिन्यानंतर कोरोना लाट आली त्यानंतर ते लखनऊला परतले. 

जीम बंद झाल्यामुळे पुष्पेंद्र बेरोजगार झाला होता. त्याचसोबत मडियाव येथे दोघं भाड्याच्या खोलीत राहत होते. रोजगाराच्या शोधात असलेल्या पुष्पेंद्रनं काही मित्रांच्या मदतीने मसकनवा गावात जीम उघडली. तो लखनऊलाही येऊन जात करत होता. त्यावरून इशरत उर्फ सोनी तिवारी आणि पुष्पेंद्रमध्ये वाद होऊ लागले. नातेवाईकांनी दोघांना वेगवेगळे राहण्याचा सल्ला दिला. परंतु पुष्पेंद्रनं नकार दिला. तेव्हा सोनीचे दुसऱ्या युवकासोबत संबंध असल्याचा संशय पुष्पेंद्रला आला. 

त्यानंतर पुष्पेंद्रनं सोनीची हत्या करण्याचा डाव रचला. त्यात भाऊ गोविंदने साथ दिली. सुरुवातीला तो तयार नव्हता परंतु पुष्पेंद्रने दृश्यम सिनेमा दाखवून त्याला तयार केला. पुष्पेंद्र आणि गोविंदचं व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हत्येत सहभागी असणाऱ्या ३ आरोपींची वेगवेगळी चौकशी करण्यात आली. तेव्हा सूरज वर्माने मैत्रीसाठी पुष्पेंद्रला साथ दिली असं कबूल केले. पुष्पेंद्रच्या कार दुरुस्तीसाठी सूरजने त्याचा बाईक गहाण ठेवून १५ हजार रुपये जमवले. 

२ सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास आदिलनगर येथील भाड्याच्या घरात ही घटना घडल्याची कबुली आरोपींनी दिली. संध्याकाळच्या सुमारास सूरजने गोविंदला त्याच्या स्कूटीवरून नेले आणि एका मित्राच्या घरी थांबवले. प्लॅननुसार पुष्पेंद्रने दरवाजा उघडून दोघांनाही खोलीत प्रवेश दिला. यानंतर गोविंदने सोनीचा पाय धरला आणि सूरजने तिचा हात पकडला. सोनीला काही समजण्यापूर्वीच पुष्पेंद्रने तिचा चेहरा टॉवेलने दाबून खून केला. बसलेल्या मुद्रेत मृतदेह जमिनीवर ठेवून वरून सॅक बांधून गाडीच्या मागच्या सीटवर मृतदेह  ठेवला. यानंतर सूरज स्कूटीवरून निघून गेला आणि दोन्ही भाऊ गाडीतून बाहेर पडले. बहराइचजवळील घाघरा नदीत मृतदेह टाकून परत आले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिलनगरमध्ये पुष्पेंद्रच्या घराजवळ हॉस्पिटल आहे. त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिघेही पोतं आणून गाडीत ठेवताना स्पष्ट दिसत आहेत. यानंतर तिघंसोबत जातानाची छायाचित्रे टेधी पुलिया आणि मुन्शी पुलिया यांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. फुटेजनुसार, गोविंद पुढच्या सीटवर बसला होता आणि पुष्पेंद्र गाडी चालवत होता. मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर प्लासिओ मॉलमध्ये पोहोचले आणि स्वत:ला वाचवण्याच्या उद्देशाने ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यानंतर सोनीचा मोबाईल झुडपात फेकून दिला. दरम्यान, दिल्लीत राहणाऱ्या सोनीच्या एका मित्राने फोन केला. तिने फोन न उचलल्याने पुष्पेंद्रशी संपर्क साधला असता, सोनी प्रियकरासह पळून गेल्याचे त्याने सांगितले. आरोपींनी पोलीस तपासात गुन्हा कबूल केला.