शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शरीरसंबंधास नकार दिल्यानं पतीकडून पत्नीची गोळ्या झाडून हत्या; ३ मुलांना कालव्यात फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 12:30 IST

१५ दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत असल्यानं पत्नीची निर्घृण हत्या; कालव्यात फेकलेली मुलं बुडाल्याची भीती

मुझफ्फरनगर: उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका ३७ वर्षीय व्यक्तीनं त्याच्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पत्नीनं शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं नाराज झालेल्या पत्नीनं पतीचा खून केला. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. यानंतर आरोपीनं स्वत:च्या ३ मुलांना कालव्यात फेकलं. मुझफ्फरनगरमधील बसेडी गावात ही घटना घडली. या मुलांचा शोध अद्याप लागलेला नाही.पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 'पत्नी १५ दिवसांपासून शरीरसंबंधास नकार देत होती. सकाळी तिनं न ऐकल्यास तिची हत्या करायची असा निश्चय आदल्या रात्रीच केला होता आणि तेच झालं. सकाळी पत्नीनं जवळ येण्यास नकार दिला. त्यामुळे तिची गोळी झाडून हत्या केली,' अशी माहिती पतीनं चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.पत्नीची हत्या केल्यानंतर पती मुलांना घेऊन कालव्याजवळ पोहोचला. पत्नीनंतर मुलांचं पालनपोषण कोण करणार, या विचारानं त्यानं मुलांना कालव्यात फेकून दिलं. सानिया, वंश आणि हर्षिता अशी या मुलांची नावं आहेत. यापैकी हर्षिता केवळ १५ महिन्यांची आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. त्याचं नाव पप्पू असं आहे. कालव्यात फेकण्यात आलेल्या मुलांचा शोध सुरू आहे. मात्र अद्याप एकही मूल हाती लागलेलं नाही. पोलिसांनी पप्पूला तुरुंगात पाठवलं असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.