शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्यानंतरही तरूणीचं सुरू होतं अफेअर, होणाऱ्या पतीकडून लोखंडी रॉडने प्रियकराची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 15:10 IST

Jodhpur Crime News : आरोपी तरूणाचा साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतर त्याला कळालं की, त्याच्या होणाऱ्या पत्नीची एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे.

राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमधून (Jodhpur) एका हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे प्रेमप्रकरणातून एका तरूणाची हत्या (Jodhpur Murder) करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, आरोपी तरूणाचा साखरपुडा झाला होता. मात्र, त्यानंतर त्याला कळालं की, त्याच्या होणाऱ्या पत्नीची एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. यामुळे संतापलेल्या तरूणाने होणाऱ्या पत्नीच्या बॉयफ्रेन्डची हत्या केली.

ही घटना जोधपूरच्या चौपासनी हाउसिंग बोर्ड भागातील आहे. इथे मंगळवारी सायंकाळी एका तरूणाची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. असे सांगितले जात आहे की, हत्येचा आरोपी टहला भीलचा काही दिवसांपूर्वीच खाखरपूडा झाला होता. नंतर त्याला समजलं की, नरेश भील त्याच्या होणाऱ्या बायकोला फोन करतो आणि त्यांच्यात काहीतरी सुरू आहे. त्यानंतर त्याने नरेश भीलला एक-दोनदा समजावलं की, माझ्या होणाऱ्या पत्नीपासून दूर रहा. (हे पण वाचा : अरे देवा! एकाच तरूणीच्या प्रेमात पडले दोन पाकिस्तानी गुंड, लग्नास नकार दिला म्हणून केली हत्या...)

मात्र, नरेश काही ऐकायला तयार नव्हता. तो तिला पुन्हा पुन्हा करून तिच्याशी बोलत होता. याची माहिती आरोपीला मिळाली तर त्याने पुन्हा नरेशला समजावलं. मंगळवारी दोघे आसनेसामने आले तेव्हा लोकांनी त्यांचा वाद मिटवला. दुपारी आरोपीला माहिती मिळाली की, नरेश चौपासनी हाउसिंग बोर्डच्या १८ सेक्टर येथील राज क्लीनिकमध्ये आहे. टहला तिथे पोहोचला आणि त्याने क्लीनिकमध्ये घुसून लोखंडी रॉडने  नरेशवर वार केले. नरेश तिथेच खाली पडला. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रियकराशी बांधायची होती लग्नगाठ, म्हणून नियोजित वरावर केला विषघात)

क्लीनिकच्या मालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी येऊन मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली. मृत नरेश हा पाक विस्थापित हिंदू आहे. आरोपी टहला सुद्धा पाक विस्थापित हिंदू आहे. घटनेनंतर पोलिसांनी मृतकाच्या घरी माहिती दिली. तर क्लीनिकमधील सीसीटीव्ही फुटेज पाहून पोलिसांनी कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान