शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तरुण प्रेमात पडला, पण मुलीकडून प्रतिसाद नाही; लग्न करण्यासाठी प्रेमवीरानं केलं विचित्र कृत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 15:00 IST

तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.

Bihar Crime ( Marathi News ) : एकतर्फी प्रेमातून अनेकदा तरुणांकडून चुकीचं पाऊल उचलण्याच्या घटना घडतात. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमधील मुंगेर इथं घडली आहे. एकतर्फी प्रेमानंतर तरुणीशी लग्न करण्यासाठी माथेफिरू तरुणाने थेट तरुणीच्या भावाचं अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रं फिरवत आरोपी तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लडैयाटांड या गावातील तरुणाला गावातीलच एक तरुणी आवडत होती. मात्र तरुणीकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र तरीही सदर तरुणाला तिच्याशीच लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याने चक्क तरुणीच्या भावाचं अपहरण केलं. आरोपी तरुणाला त्याच्या तब्बल आठ मित्रांनी अपहरणासाठी मदत केली होती. धनबाद येथून ट्रेनने घरी परत असताना हे अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर तुझ्या बहिणीला इथं बोलावलं तरंच मी तुला सोडेन, अशी धमकी आरोपीने दिली.

बहिणीला इकडे आणलं नाही तर हा तरुण माझी हत्या करेन, असं सदर तरुणीच्या भावाने फोनवरून कुटुंबीयांना सांगितलं. 

दरम्यान, मुलाचं अपहरण झाल्याचं कळताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने पोलीस आणि रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी आणि त्याच्या साथीदारांना अटक होताच सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट