शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
4
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
5
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
6
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
7
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
8
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
9
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
10
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
11
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
12
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
13
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
14
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
15
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
16
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
17
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
18
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
19
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'

ऐसी दीवानगी: एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुलीपासून पिच्छा सोडवण्यासाठी दीड वर्ष लपला, घरी परतल्यावर झाला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 4:58 PM

तरूणी एका बुटीकच्या मालकावर इतकी फीदा झाली की, त्याच्यासोबत लग्न करण्याचा ती हट्ट करू लागली. जेव्हा बुटीक मालकाने नकार दिला तर भावांकडून त्याच्यावर हल्ला केला.

एकतर्फी प्रेमाच्या अनेक विचित्र घटना सतत समोर येत असतात. पण त्यात सामान्यपणे तरूण काहीतरी विचित्र करताना अधिक बघायला मिळतात. तरूणीने एकतर्फी प्रेमातून काही विचित्र केल्याचं फार कमी ऐकायला मिळतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एक तरूणी एका बुटीकच्या मालकावर इतकी फीदा झाली की, त्याच्यासोबत लग्न करण्याचा ती हट्ट करू लागली. जेव्हा बुटीक मालकाने नकार दिला तर भावांकडून त्याच्यावर हल्ला केला. एकतर्फी प्रेमातून घडलेली ही घटना पंजाबच्या जालंधरमधून समोर आली आहे.

माथेफिरू तरूणीला टाळण्यासाठी बुटीकचा मालक साधारण दीड वर्षांपासून वेगवेगळ्या राज्यांमध्ये लपत राहिला. जेव्हा त्याला वाटलं की, आता तरूणीला शांत झाली असेल आणि सगळं ठीक झालं असेल तर तो घरी परतला. तो परत  आल्याची खबर लागताच तरूणीच्या भावाने आणि त्यांच्या दोन मित्रांनी बुटीक मालकाच्या गळ्यावर चाकूने वार केला. आता पोलिसांनी आरोपी तरूणी आणि तिच्या भावांवर गुन्हा दाखल केला आहे. (हे पण वाचा : अरे देवा! प्रेमासाठी जावयासोबत पुण्याला पळून आली होती सासू, पुढे जे घडलं ते वाचून चक्रावून जाल....)

जालंधरच्या जयराज(34) ने सांगितले की, तो दोन वर्षांआधी पक्का बागेत एक बुटीक चालवत होता. त्याच्यासोबत दानिशमंदा भागातील एक तरूणीही काम करत होती. एक दिवस त्याला समजलं की, ती तरूणी इतरांना स्वत:ला त्याची पत्नी असल्याचं सांगत आहे. ग्राहकांकडून जेव्हा त्याला हे समजलं तर त्याने तिला याबाबत विचारलं. काही हरकत नाही तू माझ्यासोबत लग्न कर. हे ऐकून त्याला धक्का बसला. त्याने लग्न करण्यास नकार दिला. मात्र ती लग्न करण्यावर अडून बसली. (हे पण वाचा : भांडणाला वैतागून मुलाने वयोवृद्ध आईची गळा दाबून केली हत्या; पुरावे लपवण्यासाठी लढवली अनोखी शक्कल )

हे प्रकरण पोलिसात गेलं तेव्हा तो घाबरून जम्मू आणि हिमाचलमध्ये गेला. साधारण दीड वर्षाने तो हा विचार करून परत आला की, आता सगळं शांत झालं असेल. तरूणी मागे लागणार नाही. तिच्या डोक्यातून लग्ना भूत गेलं असेल. घरी परतल्यावर तो जेव्हा बाहेर बर्गर खाण्यासाठी गेला तेव्हा तिथे तिचा भाऊ त्याच्या मित्रांना घेऊन आला. त्यांनी त्याच्या मानेवर चाकूने वार केला. रक्त निघू लागलं तर तो जमिनीवर पडला. आरोपी तिथून पसार झाले.

हल्ल्याची माहिती मिळताच त्याचा भाऊ त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पोलिसांनी चौकशीनंतर आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केलाय. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाब