शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! प्रियकरासह पत्नी पळाली, खचलेल्या पतीने लेकीसह तिघांना संपवलं अन् स्वत:ही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 11:48 IST

जसविंदर सिंह उर्फ राजू कुटुंबासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून प्रियकरासह पळून गेली होती. त्यामुळे कुटुंबीय नाराज झाले होते.

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी तिच्या प्रियकरासह पळून गेल्यानंतर पतीने कुटुंबातील तीन सदस्यांसह आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय जसविंदर सिंह उर्फ राजू कुटुंबासोबत राहत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून प्रियकरासह पळून गेली होती. त्यामुळे कुटुंबीय नाराज झाले होते.

जसविंदर सिंह उर्फ राजू याने दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्ह करून आपली सर्व गोष्ट सांगितली होती आणि आत्महत्या करणार असल्याचं देखील म्हटलं होतं. त्यानंतर मंगळवारी जसविंदरने त्याचा 11 वर्षांचा पुतण्या आगम, 11 वर्षांची मुलगी गुरलीन कौर आणि त्याचा मोठा भाऊ हरप्रीत उर्फ बंटू यांच्यासह घलखुर्द कालव्यात कार टाकली. लोकांच्या मदतीने गाडी कालव्यातून बाहेर काढण्यात आली.

कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कार आणि कारमधील प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या अपघातात चौघांचाही मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. कार कालव्यात फेकणारा जसविंदरचा मुलगा दिव्यांश आणि भाऊ सोनू यांनी सांगितले की, त्यांचे वडील जसविंदर सिंह उर्फ राजू हे बऱ्याच दिवसांपासून नाराज होते. कारण, त्याची आई दुसऱ्या कुणासोबत पळून गेली होती.

घलखुर्दचे एसएचओ अभिनव चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी कार आणि कारमधील लोकांचे मृतदेह शोधून त्यांना बाहेर काढले आहे. चारही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी