शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आशिष शेलार यांना धमकावणाऱ्याला अटक; माहीम कॉजवेमधून घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 07:31 IST

गेल्या दोन दिवसांपासून शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे कॉल येत आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कॉलर हा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच अपशब्दही वापरत होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  भाजप आमदार आशिष शेलार यांना फोनवर शिवीगाळ करत धमकावल्याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने माहीम कॉजवे येथे राहणाऱ्या ओसामा समशेद खान (४८) याला शनिवारी ताब्यात घेतले. जमिनीच्या वादातून आलेल्या निराशेत त्याने हे केल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. या प्रकरणी शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना लेखी तक्रार दिली होती.

गेल्या दोन दिवसांपासून शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे कॉल येत आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कॉलर हा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच अपशब्दही वापरत होता. शेलार यांना धमकावल्याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि समांतरपणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ ने तांत्रिक तपास सुरू केला. यात त्यांना कॉलरची माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारे खान याला ताब्यात घेतले. खान याला पुढील चौकशीसाठी वांद्रे पोलिसांकडे सुपुर्द केले जाणार आहे, असे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी सांगितले.

भ्रष्टाचार उघड केल्यानेच धमकी  भाजप आमदार आशिष शेलार सातत्याने राज्य सरकारचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार उघडकीस आणत आहेत. सरकारच्या विरोधात भूमिका मांडत असल्यामुळेच त्यांना धमकी आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोलिसांनी ही धमकी गंभीरपणे घेतली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यानिमित्ताने केली आहे.  

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलार