शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:30 IST

आग्र्यातील छत्ता भागात एका आईने आपल्या २ वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह गटारात फेकला.

आईच्या प्रेमाला आणि ममता या शब्दाला काळिमा फासणारी एक अत्यंत भयानक घटना आग्र्यातील छत्ता परिसरातून समोर आली आहे. एका महिलेने आपल्या अवघ्या २ वर्षांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह गटारात फेकून दिला. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्यामुळे या क्रूर मातेने आपल्याच काळजाच्या तुकड्याचा बळी घेतल्याचा खळबळजनक आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

गटारात तरंगताना आढळला चिमुरडीचा मृतदेह

यमुना किनारा मार्गावरील लड्डू गोपाल प्रतिमा आणि यमुना आरती स्थळाच्या दरम्यान असलेल्या एका अरुंद गटारात मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास २ वर्षीय खुशीचा मृतदेह आढळला. पाईपलाईनच्या बाजूला पाणी साचल्याने सुरुवातीला हा मृतदेह कोणाच्याही नजरेस पडला नाही. मात्र, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि ओळख पटवण्याचे काम सुरू केले.

डॉक्टरकडे जाते सांगून निघाली अन्...

मृत खुशीचे वडील रामू धाकड यांनी दिलेली माहिती अंगावर शहारे आणणारी आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये रामू यांचा विवाह बिहारच्या ममताशी झाला होता. मंगळवारी सकाळी ११ वाजता ममता "लेकीला डॉक्टरकडे घेऊन जाते" असे सांगून घरून पडली ती परतलीच नाही. जेव्हा बराच वेळ झाला तरी ती आली नाही, तेव्हा रामू यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरा पोलिसांनी जेव्हा खुशीचा फोटो दाखवला, तेव्हा बापाच्या पायाखालची जमीनच सरकली.

अनैतिक संबंधांतून लेकीची हत्या?

रामू यांनी पत्नी ममतावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. ममताचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते, असा दावा त्यांनी केला आहे. ती तासन् तास फोनवर बोलायची आणि याआधीही अनेकदा कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. आपल्या प्रियकरासोबत राहण्यासाठी तिने निष्पाप खुशीला वाटेतून बाजूला केले आणि तिची हत्या केली, असा संताप वडिलांनी व्यक्त केला आहे.

पोलीस तपासात काय समोर आले?

एसीपी शेषमणी उपाध्याय यांनी सांगितले की, प्राथमिक तपासणीत मुलीच्या शरीरावर जखमेच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. तिचा मृत्यू गळा दाबल्याने झाला की पाण्यात बुडवून, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले असून ती वारंवार आपली विधाने बदलत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mother kills 2-year-old daughter for lover in Agra, India.

Web Summary : In Agra, a mother strangled her two-year-old daughter, Khushi, and dumped her body in a drain due to an illicit affair. The father alleges the mother murdered the child to be with her lover. The police arrested the accused, who keeps changing her statement.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली