शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव स्फोट: 'त्या' बाईक कोर्टात आणल्या, न्यायाधीशांनी पाहिल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 20:27 IST

बॉम्बस्फोटासाठी वापरलेली मोटारबाईक साक्षीदाराने ओळखली

ठळक मुद्देहे पुरावे तपासण्यासाठी न्यायाधीशांना वकील, साक्षीदार आणि आपल्या स्टाफसह कोर्टाखाली उतरावं लागलं आहे. याच सुनावणीदरम्यान आरोपी समीर कुलकर्णीच केवळ कोर्टात उपस्थित होते असून उद्यापर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. 

मुंबई: मालेगाव २००८ बॉम्बस्फोट घडविण्यासाठी भाजपची भोपाळची खासदार प्रज्ञासिंह ठाकूर हिच्या मोटारबाईकमध्ये स्फोटके ठेवण्यात आली, असा आरोप ठाकूरवर आहे. ही बाईक आणि पाच सायकली पुरावा म्हणून एका टेम्पोमधून सोमवारी विशेष एनआयए न्यायालयात आणण्यात आल्या. पुराव्यांची पाहणी करण्यासाठी न्यायाधीशांसह, वकील व साक्षीदार कोर्टरुम सोडून न्यायालयाच्या इमारतीखाली उतरले व ज्या टेंपोमध्ये हे पुरावे आणण्यात आले होते, त्या टेंपोत चढून पुराव्यांची पाहणी केली. दरम्यान, साक्षीदाराने बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारबाईक न्यायाधीशांसमोर ओळखली.नाशिकमधील मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात सहाजण मृत्यूमुखी पडली तर १०० हून अधिक लोक जखमी झाली. या बॉम्बस्फोटासाठी स्फोटके ठेवण्याकरिता ठाकूरची ‘एलएमएल फ्रीडम’ वापरण्यात आली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. घटनेच्या दिवशी हीच मोटारबाईक घटनास्थळावर होती, अशी साक्ष एका साक्षीदाराने न्यायाधीशांसमोर दिली.सुरुवातील या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस)ने केला. बॉम्बस्फोटासाठी स्फोटके ठेवण्याकरिता ठाकूरने तिच्या जवळची व्यक्ती व याप्रकरणी अद्यापही फरारी असलेला रामजी कलसंग्रा याला दिली, असा आरोप एटीएसने केला आहे.त्यनंतर २०१११ नंतर हा तपास राष्ट्रीय तपास पथक (एनआयए)कडे वर्ग करण्यात आला. एनआयएने २०१६ मध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करून ठाकूरला क्लीनचिट दिली. बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारबाईक ठाकूरच्या ताब्यात नव्हती. बॉम्बस्फोटापूर्वी दोन वर्ष ती बाईक कलसंग्राच्या ताब्यात होती. त्यामुळे तिचा या बॉम्बस्फोटाशी संबंध नाही, असे म्हणत एनआयएने ठाकूरला क्लीनचिट दिली.एनआयएने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राचा हवाला देत ठाकूरने या आरोपातून मुक्त करण्यासाठी विशेष न्यायालयात अर्ज सादर केला. २७ डिसेंबर २०१७ रोजी विशेष न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला. सकृतदर्शनी, बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारबाईक ठाकूरच्या नावावर आहे. आरटीओमध्ये तिच्याच नावावर संबंधित मोटारबाईकची नोंदणी करण्यात आलेली आहे. ती मोटारबाईक आजही तिच्याच नावावर आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.विशेष न्यायालयात या खटल्यावर दररोज सुनावणी सुरू आहे. आता मंगळवारी यावर सुनावणी सुरू राहणार आहे. समीर कुलकर्णीशिवाय सोमवारच्या सुनावणीत एकही आरोपी उपस्थित नव्हता.ठाकूरशिवाय या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या खटल्यात आरोपी आहेत.

 

 

टॅग्स :Malegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोटNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालयSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाMumbaiमुंबई