शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून गंडा, तीन लाखांची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:14 IST

महागड्या गाड्या स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दीप्ती रविकांत मुळीक (३४, रा. माहीम, मुंबई) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खारेगाव येथील रहिवासी किरण शहा (४०) यांनी तक्रार दाखल केली आहे.

ठाणे : महागड्या गाड्या स्वस्तामध्ये देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी दीप्ती रविकांत मुळीक (३४, रा. माहीम, मुंबई) यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने गुरुवारी अटक केली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात खारेगाव येथील रहिवासी किरण शहा (४०) यांनी तक्रार दाखल केली आहे.वेगवेगळी वाहने विक्री करणाऱ्या कंपन्यांशी आपली ओळख असल्याची दीप्ती हिने शहा यांना बतावणी केली होती. त्यानुसार, ३१ लाख ५६ हजार १२६ रुपयांची नामांकित कंपनीची कार अवघ्या आठ लाख ५० हजारांमध्ये मिळवून देते, असे सांगत त्यांच्यासह त्यांचा मॅनेजर चंदन यादव यांच्याकडून दोन लाख ८५ हजारांची रक्कम कळवा येथील रूपाली कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयात तिने घेतली. ही रक्कम घेतल्यानंतर गाडी बुकिंग केल्याचे सांगून तीन लाख रुपयांची बनावट पावती व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांना दिली. मात्र, त्यांची कोणतीही गाडी बुकिंग न करता तसेच गाडीही न देता, त्यांची दोन लाख ८५ हजारांची फसवणूक केली.हा प्रकार २१ डिसेंबर २०१८ ते ७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत घडला. आपले पैसे किंवा गाडी न मिळाल्याने शहा यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात ७ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली.आरोपी महिलेस अटकआरोपी महिलेस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी अटक केली. तिने आणखीही कोणाची फसवणूक केली आहे का, यामध्ये तिचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी