शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

BSFची मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर चीनी गुप्तहेराला बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 21:51 IST

Major action of BSF :जुनवेई याच्या एका साथीदाराला उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने अटक केली आहे.

ठळक मुद्देजुनवेई गैर हेतूने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बीएसएफने बांगलादेश सीमेवरुन बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणाऱ्या एका चीनी नागरिकाला अटक केली. हा चीनी नागरिक पश्चिम बंगालच्या मालदामध्ये प्रवेश करताना अटक करण्यात आली. हा चीनी नागरिक गुप्तहेर होता हे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे. त्याचे नाव हान जुनवेई (३६) आहे. जुनवेई गैर हेतूने भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

चीनी गुप्तहेराचा अंगझडती केली असता त्याच्याकडे, चायनीज पासपोर्ट, एक अ‍ॅपल लॅपटॉप, २ आयफोन मोबाइल, १ बांगलादेशी सिम, १ भारतीय सिम, २ चीनी सिम, २ पेन ड्राईव्ह, ३ बॅटरी, दोन लहान टॉर्च, ५ पैशांचे व्यवहार मशीन, २ एटीएम कार्ड, यूएस डॉलर अन्य वस्तू सापडल्या. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, २०१० साली तो प्रथम हैदराबादला आला होता. त्यानंतर तो २०१९ नंतर तीनदा दिल्ली-गुरुग्राम येथे आला होता. त्याचा सध्याचा पासपोर्ट चीनच्या हुबेई प्रांताचा आहे. 

जुनवेई याच्या एका साथीदाराला उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएसने अटक केली आहे. चौकशीदरम्यान हान जुनवेई याने त्याचा साथीदार दरमहा १०-१५ भारतीय सिम कार्ड चिनमध्ये पाठवत होता असा खुलासा केला आहे. पुढे जुनवेई यांनी सांगितले की, गुरुग्राममध्ये त्याचे एक हॉटेल आहे, ज्यात इतर अनेक चीनी नागरिक कार्यरत आहेत.

टॅग्स :ArrestअटकchinaचीनIndiaभारतBSFसीमा सुरक्षा दलpassportपासपोर्ट