शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रेय कंपनी फसवणूक प्रकरण : मुंबईच्या सक्षम प्राधिकारीकडे पाठविला अहवाल, राज्यभरात २७ ठिकाणी गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 17:45 IST

मैत्रेय कंपनीच्या राज्यातील उघड मालमत्तेचा लेखाजोखा अहवाल मुंबईचे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. अमरावतीत आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची १२५ कोटींची  मालमत्ता उघड केली. त्याचा लेखाजोखा अहवाल १४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आला. 

अमरावती : मैत्रेय कंपनीच्या राज्यातील उघड मालमत्तेचा लेखाजोखा अहवाल मुंबईचे सक्षम प्राधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येत आहे. अमरावतीत आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयची १२५ कोटींची  मालमत्ता उघड केली. त्याचा लेखाजोखा अहवाल १४ आॅगस्ट रोजी पाठविण्यात आला.      गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून दुप्पट, तिप्पट पैसे करण्याचे आमिष दाखविणाºया मैत्रेय कंपनीविरुद्ध राज्यभरात २७ पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद झाली आहे. राज्यभरातील तब्बल ४६ लाख गुंतवणूकदारांची २८२० कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. मैत्रेयच्या राज्यभरातील ३०८ मालमत्ता उघड झाल्या असून, त्यासंदर्भात राज्यभरातील विविध गुन्ह्यांत तक्रारी किती, फसवणुकीची रक्कम किती, अशा प्रकारची माहिती सक्षम प्राधिकारी यांच्याकडे संबंधित पोलीस पाठवित आहेत. सक्षम प्राधिकारी म्हणून मुंबईचे उपजिल्हाधिकारी तरुण खत्री यांची नियुक्ती झाली असून, त्यांच्यामार्फत आता मंत्रालयस्तर व न्यायालयीन परवानगीनंतर मैत्रेयची मालमत्ता लिलाव करून गुतंवणूकदारांचे पैसे परत करण्याची प्रकिया सुरू होणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. 

अमरावतीत १ लाख ७२ हजार गुंतवणूकदारमैत्रेय कंपनीविरुद्ध अमरावतीच्या कोतवाली ठाण्यात पहिली तक्रार मार्च २०१६ ला नोंदविण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी वर्षा सत्पाळकर, जनार्दन परूळेकर, विजय तावरे, लक्ष्मीकांत नार्वेकर (सर्व रा.वसई, मुंबई), हर्षद पाटील (रा. अमरावती) व प्रमोद डाखोरे (रा. चंद्रपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे ४२ हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामध्ये नागरिकांची ८५ कोटींनी फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.  आर्थिक गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली, तर वर्षा सत्पाळकर अद्यापही पोलिसांच्या हाती लागली नाही. 

असोसिएशनने घेतली गृहसचिवांची भेटराज्यस्तरावरील एका असोसिएशनने १३ आॅगस्ट रोजी मुंबई येथे गृहविभागाच्या उपसचिवांची भेट घेतली. त्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी कमिटीचे प्रमुख उपजिल्हाधिकारी खत्री यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली. मैत्रेयच्या आतापर्यंतच्या ३०८ प्रॉपर्टी उघड झाल्या असून, त्यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर मालमत्तेच्या लिलावासाठी कोर्टात विक्रीच्या परवानगीसाठी प्रकरणे जाईल.  परवानगी मिळाल्यानंतर विक्री करून लवकर ‘रिपेमेंट’ प्रक्रिया सुरू केले जाईल. मात्र, कंपनीकडे जे कस्टमर डाटा आहे त्यांतील खरे ग्राहक  कोण आहेत, याची तपासणी सुरु असल्याची माहिती असोसिएशनला मिळाली. असोसिएशनच्यावतीने डी. बी पाटील, सुभाष पाटील, नीलेश वाणी, मंगलसिंह परदेशी, सांगलीचे विनायक चव्हाण, दत्ता शिंगाडे, महेंद्र ऊर्फ पिंटू दर्डा व सर्व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Crimeगुन्हाAmravatiअमरावती