शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोलकरणीने चाकूचा धाक दाखवुन साडे सात लाखांचा ऐवज लुटला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 23:16 IST

एका संकेत स्थळावरुन घरकामासाठी आणलेल्या महिलेने घातला गंडा

मीरारोड - एका संकेत स्थळावरुन घरकामासाठी आणलेल्या महिलेने घरात एकटट्या असलेल्या ११ वर्षाच्या मुलीस चाकूचा धाक दाखवत मारहाण केली व घरातील साडे सात लाख रुपयांचे दागीने, मोबाईल असा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना मीरारोडच्या गोकुळ व्हिलेज भागात घडली आहे.ग्रीन पार्क मध्ये पती, मुलगी हिबा (११) सह राहणाराया सबीना करीम यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. त्यासाठी जवळच एक दुकान त्यांनी भाड्याने घेतलेले आहे. पती नोकरीला असुन पार्लरच्या व्यवसायासाठी वेळ मिळावा म्हणुन वर्क इंडिया या संकेत स्थळावरुन जुन २०१९ मध्ये त्यांनी तस्लीम सय्यद रा. कांदिवली या महिलेस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १० हजार महिने पगारावर घरकामासाठी ठेवले होते. परंतु तीचे काम न आवडल्याने जुलै महिन्यातच तीला कामा वरुन कमी केले होते.त्या दरम्यान सबीना यांना तस्लीम सह संकेतस्थळ कंपनीने तीची सविस्तर माहिती दिली नव्हती. कामा वरुन कमी करताना तस्लीमने आपली मुलगी आंधळी असुन किडनीचा विकार असल्याचे सांगुन तुम्हास पार्लरसाठी गिऱ्हाईक आणुन देईन त्याचे कमीशन मला द्या असे सांगीतले होते. त्या नुसार तीने एकदा मुस्कान नावाची महिला गि-हाईक पाठवली होती. सबीनाने तिचे झालेले ५ हजार बिल तस्लीमला मुलीच्या उपचारा करता दिले होते.१२ डिसेंबर रोजी मुस्कान पार्लरसाठी तस्लीम सह आली. त्यावेळी तस्लीम कारण सांगुन थेट सबीनाच्या घरी गेली. घरात असलेल्या हिबा ला तीने चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. नंतर घरातील कपाटातुन सोन्याचे दागीने तसेच मोबाईल असा साडे सात लाखांचा ऐवज लुटुन तीने पळ काढला. या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी