शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाचे स्वस्त घर आजोबांना पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 06:22 IST

३७ लाखांची फसवणूक : नेहरूनगर पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : म्हाडाचे अधिकारी असल्याचे भासवून म्हाडाच्या स्वस्त घराचे आमिष दाखवून ठगांनी ६० वर्षांच्या आजोबांकडून ३७ लाख ७३ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार अ‍ॅण्टॉप हिलमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी नेहरूनगर पोलिसांनी शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अ‍ॅण्टॉप हिल येथील कान्हेरनगर परिसरात वसंत विष्णू मस्तुद (६०) हे कुटुंबीयांसोबत राहतात. जुलै २०१५ मध्ये आरोपींनी म्हाडाचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याशी ओळख केली. त्यांना म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांच्या उच्च राहणीमानाला भुलून त्यांनीही तयारी दर्शवली. त्यानुसार, आरोपींनी म्हाडाची बनावट कागदपत्रे तयार करून नोव्हेंबर २०१८ पर्यंत मस्तुद यांच्याकडून ३७ लाख ७३ हजार ७०० रुपये उकळले.

हक्काच्या घरात लवकरच जाणार असे स्वप्न त्यांनी रंगविले. मात्र, पैसे भरूनही घर मिळत नसल्याने त्यांना संशय आला. आरोपीही टाळाटाळ करत असल्याने त्यांनी पैसे परत करण्याबाबत तगादा लावला. पैसे मिळाले नाहीत. अखेर, शनिवारी त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी दिलेली कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेत, तपास सुरू आहे. 

वृद्ध ठरताहेत सॉफ्ट टार्गेटयापूर्वीही म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांना गंडा घातल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे तुम्हीही अशा टोळीच्या जाळ्यात अडकण्यापूर्वी कागदपत्रे, घराची खातरजमा करा. कुणावरही विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. यात वृद्धांना जास्त टार्गेट केले जाते. त्यामुळे त्यांनी याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे, असेही पोलिसांनी नमूद केले.

टॅग्स :fraudधोकेबाजी