शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

महाराष्ट्रातील खळबळजनक घटना; छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून आईवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 09:44 IST

एकदा नाही तर वारंवार महिलेला धमकी देत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

नाशिक – महाराष्ट्रच्या नाशिकमध्ये ह्दयद्रावक घटना घडली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात कुठेही कमी होताना दिसत नाही. त्यातच आता छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून तिला ठार मारण्याची धमकी देत एका महिलेवर बलात्कार केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून नाशिक जिल्ह्यातील सातपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील क्रूरता पाहून पोलीसही हैराण झाले आहेत.

एकदा नाही तर वारंवार महिलेला धमकी देत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत म्हटलंय की, आरोपीने त्र्यंबकेश्वरच्या एका लॉजमध्ये १७ डिसेंबरला पूर्ण रात्र बलात्कार केला. जेव्हा पीडितेने आरोपीच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्या छोट्या मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याचप्रकारे त्याने धमकी देत पीडित महिलेवर विविध ठिकाणी अनेकदा बलात्कार केले.

मित्राच्या घरीही महिलेवर केला बलात्कार

आरोपी आजाद शेखने संबंधित महिलेसोबत १७ डिसेंबरला रात्री लॉजवर बलात्कार केला. त्यानंतर त्या महिलेला मित्राच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणीही आरोपीने महिलेवर अतिप्रसंग केला. त्यानंतर महिलेला सोडून दिलं आणि नाशिकमधून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपी रेल्वे स्टेशनला पोहचला होता आणि बाहेर जाणाऱ्या गाडीची वाट पाहत होता परंतु पोलिसांना त्याची कारनाम्याची भनक लागली. तातडीने पोलिसांनी नाशिक रोड रेल्वे स्टेशन गाठलं आणि आरोपीला पकडण्यात यश आलं. या महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी आजाद शेखवर कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

टॅग्स :Nashikनाशिक