शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र जमीन भाडेपट्टा कायदा ४ वर्षांपासून केंद्राने दाबला; विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 05:12 IST

महाराष्ट्र विधानसभेने ते विधेयक संमत केले असून २५ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून दिले होते.

हरीश गुप्तानवी दिल्ली : शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आम्ही तीन नवे कृषी कायदे केल्याचा दावा करते; परंतु विरोधाभास असा की, महाराष्ट्र कृषी जमीन भाडेपट्टा कायदा (महाराष्ट्र ॲग्रिकल्चरल लँड लिझिंग ॲक्ट-एमएएलएलए) केंद्र सरकारने चार वर्षांपासून दाबून ठेवला आहे. 

महाराष्ट्र विधानसभेने ते विधेयक संमत केले असून २५ एप्रिल, २०१७ रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून दिले होते. राज्यांनी बनवलेल्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते. राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार असताना हे विधेयक विधानसभेत संमत झाले होते; परंतु ते विधेयक या ना त्या कारणामुळे लोंबकळले आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी संसदेत एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरामुळे वस्तुस्थिती समोर आली. रेड्डी म्हणाले, “प्रथेप्रमाणे राज्यांकडून विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी विधेयके मिळालीआणि केंद्र सरकारची नोडल मंत्रालये, विभागांशी विचारविनिमय करून प्रक्रिया केली गेली आहे.”

कृपाल बालाजी तुमाने आणि हरिभाऊ जाधव यांनी विचारलेल्या दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी म्हणाले की, महाराष्ट्र कृषी जमीन भाडेपट्टा विधेयक २०१७ बाबत वेगवेगळी मंत्रालये, विभागांशी विचारविनिमयाची प्रक्रिया १२ मे २०१७ रोजी सुरू करण्यात आली आहे. दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले की, महाराष्ट्र सरकारकडून काही मुद्यांवर केंद्र सरकारच्या विभागांनी अनेक स्पष्टीकरणे आणि उत्तरे मागितली होती.

विचारविनिमयाच्या प्रक्रियेला वेळ लागतो

महाराष्ट्र सरकारकडून सर्व स्पष्टीकरणे १४ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली असून संबंधित मंत्रालये आणि विभागांशी विचारविनिमय करून त्यांची तपासणीही केली गेली आहे, असा दुजोरा केंद्र सरकारने दिला. सरकारला सदस्यांनी विधेयकाला मंजुरी का मिळाली नाही आणि ती कधी मिळेल याची माहिती द्या, असे जोर देऊन म्हटल्यावर मंत्री रेड्डी यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, “अशा प्रकरणांत विचारविनिमयाच्या प्रक्रियेला वेळ लागतो. अशा मंजुरीसाठी ठराविक मुदतीची चौकट घालता येणार नाही.”