शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील हेड कॉन्स्टेबलच्या घरावर, फार्म हाऊसवर छापा; 14 गाड्यांसह 4 कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 14:09 IST

Madhya Pradesh: मंगळवारी केलेल्या या कारवाईत लोकायुक्त पथकाने 4.39 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 14 वाहने जप्त केली आहेत. 

जबलपूर : मध्य प्रदेशातील बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी जबलपूर लोकायुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेश पोलिसात कार्यरत हेड कॉन्स्टेबल सच्चिदानंद सिंह यांच्या घरावर आणि फार्म हाऊसवर लोकायुक्तांनी छापा टाकला, त्यावेळी संपत्ती पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. 

दरम्यान, या कारवाईवेळी पथकाने कोट्यवधींची मालमत्ता आणि अनेक वाहने जप्त केली आहेत. हेड कॉन्स्टेबल सच्चिदानंद सिंह सध्या तिलवारघाट पोलिस स्टेशनमध्ये तैनात आहेत. करोडपती हेड कॉन्स्टेबलवर झालेल्या या कारवाईने विभागात खळबळ उडाली आहे. मंगळवारी केलेल्या या कारवाईत लोकायुक्त पथकाने 4.39 कोटी रुपयांची मालमत्ता आणि 14 वाहने जप्त केली आहेत. 

पोलीस उपअधीक्षक (लोकायुक्त) जेपी वर्मा म्हणाले, "छापा मारताना आमच्या पथकाला 4.39 कोटी रुपयांची मालमत्ता, फार्म हाऊस, वाहने, शेतजमीन, दागिने, 14 वाहने आणि  इतर जीवनावश्यक वस्तू सापडल्या आहेत." आता याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, असे जेपी वर्मा यांनी सांगितले.

शिवपुरीमध्ये असेच प्रकरण आले होते समोर दरम्यान, यापूर्वी मध्य प्रदेशातही असेच प्रकरण समोर आले होते. ऑक्टोबर महिन्यात ईओडब्ल्यूने (EOW) शिवपुरी जिल्ह्यातील सहाय्यक समिती व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात महिन्याचे 12 हजार रुपये पगार घेणाऱ्या व्यवस्थापकाच्या घरात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता सापडली. शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस तालुक्यातील पाचवली सहकारी बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा नुकताच उघडकीस आला होता. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार ईओडब्ल्यूच्या पथकाने विजयपुरम कॉलनीत राहणारे एमएस भार्गव यांच्या घरावर छापा टाकून कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश