शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मित्राकडून डॉक्टर महिलेवर बलात्कार, व्हिडीओ तयार करून उकळले दीड लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 10:18 IST

Crime News : यासंदर्भात अधिक माहिती देताना भोपाळच्या पिपलानी पोलीस ठाण्याचे चैनसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, बुधवारी 24 वर्षीय एमबीबीएस डॉक्टर महिलाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका महिला डॉक्टरने आपल्या मित्राविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला आहे. मित्राने आधी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले, त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैसेही काढून घेतले, असा या डॉक्टर महिलेचा आरोप आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती देताना भोपाळच्या पिपलानी पोलीस ठाण्याचे चैनसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, बुधवारी 24 वर्षीय एमबीबीएस डॉक्टर महिलाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या मित्राने एमपी नगर आणि पिपलानी भागातील हॉटेलमध्ये तिच्यासोबत बलात्कार केला. यावेळी त्याने व्हिडीओ सुद्धा तयार केला. यानंतर हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने जवळपास दीड लाख रुपयेही या महिलेकडून घेतले. यानंतरही आरोपीने महिलेचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर  पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची दोन वर्षांपूर्वी आरोपी युवकासोबत मैत्री झाली होती. दोघेही मैत्रीनंतर बरेच दिवस एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर नोव्हेंबर 2019 मध्ये आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले आणि त्याठिकाणी तिच्यासोबत बलात्कार केला आणि व्हिडीओ तयार केला. यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून जवळपास दीड लाख रुपये घेतले.

पीडित महिलेने केलेल्या आरोपाच्या आधारे आरोपीच्या बँक अकाऊंट डिटेल्स तपासले जात आहेत. टीआयच्या म्हणण्यानुसार आरोपी युवक इंदूरचा रहिवासी आहे. सध्या आरोपीविरोधात कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीतून पैसे काढल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करता येऊ शकतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश