शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : साखरपूडा झाला, तरी एका मुलीशी फोनवर बोलत होता पोरगा; वडिलांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 09:46 IST

Crime News : वडिलांनी पत्नी आणि मुलीच्या मदतीनं मृतहेदाची लावली विल्हेवाट.

Crime News : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) बुरहानपूरमध्ये एका पित्याने आपल्या मुलाची हत्या केली. यानंतर पत्नी आणि मुलीसह त्यानं मुलाच्या मृतदेहाचीही विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १५ दिवसांनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी एका दोरीच्या सहाय्याने या प्रकरणाची उकल केली.

बुरहानपूरचे एसपी राहुल कुमार लोढा यांनी याप्रकरणी अधिक माहिती दिली. "ही घटना निबोला पोलीस स्थानक क्षेत्रातील धुलकोट गावातील आहे. ५ जानेवारीला रुपारेल नदीत रामकृष्ण नावाच्या तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे हात-पाय दोरीने बांधलेले होते. मृत व्यक्तीचा त्याच्या कुटुंबीयांशी सातत्यानं वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे. अधिक तपास केला असता, मृत व्यक्तीच्या हातापायांनाच बांधण्यात आलेली दोरी ही त्याच्या घरी सापडली. या आधारे रामकृष्णचे वडील, आई आणि बहिणीची चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ​​हत्येची हत्या केल्याचं सांगितलं," अशी माहिती पोलिसांनी दिली.

बाथरूमच्या भिंतीला डोकं आपटलं"रामकृष्ण याचा साखरपुडा झाला होता. असं असूनही तो दिवसभर दुसऱ्या मुलीशी बोलत असायचा," असं त्याच्या आई, वडील आणि बहिणीने सांगितले. २ जानेवारीच्या रात्री दहाच्या सुमारास रामकृष्ण हा एका तरुणीशी फोनवर बोलत होता. त्यामुळे त्याचे वडील भीमन सिंह संतापले आणि त्यांनी रामकृष्णवर ओरडले. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात त्यांनी रामकृष्णला कानशीलात लगावली आणि त्याला धक्का दिला.

धक्का दिल्यानंतर तो बाथरूमच्या दरवाज्यावर आपटला आणि जमिनीवर कोसळला. यानंतर त्याच्या वडिलांनी त्याच्या छातीवर जोरात लाथ मारली. ज्यावेळी त्याच्या शरिराची कोणतीही हालचाल दिसली नाही, तेव्हा वडिलांनी घाबरून त्याचे हात पाय दोरीने बांधले. यानंतर वडील, आई आणि त्याची बहिण यांनी मिळून त्याचा मृतदेह रुपरेल नदीत फेकला. आरोपींची चौकशी करून त्यांना न्यायालयात हजरकरण्यात आलं. न्यायालयानं त्यांची रवानगी आता तुरूंगात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश