लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : एका महिलेच्या ओळखी गैरफायदा घेत एका युवकाने तिच्यावर अत्याचार केला. सोबतच त्याची चित्रफीत तयार करून महिलेस वारंवार ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून ३० वर्षीय युवकाविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.फ्रीजसाठी कर्ज घेताना एका ४२ वर्षीय महिलेची ३० वर्षीय युवकासोबत ओळख झाली. या ओळखीचा गैरफायदा घेत, युवकाने महिलेशी संबंध प्रस्थापित केले. दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अत्याचारांची चित्रफीतही आरोपी युवकाने तयार केली होती. या अश्लील चित्रफितीच्या आधारे युवकाने महिलेची आर्थिक फसवणूक ही सुरू केली होती. महिलेकडून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतल्यानंतरही समाधान न झालेल्या युवकाने पीडितेला वारंवार त्रास देणे सुरूच ठेवले. दरम्यान, अश्लील चित्रफीत महिलेच्या पतीला दाखविण्याची, तसेच सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत आणखी पैशांची मागणी या युवकाने केली. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने खामगाव शहर पोलिस ठाण्यात संबंधित युवकाविरोधात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमान्वये संबंधित युवकावर गुन्हे दाखल केले आहेत.
अत्याचार करून महिलेची अश्लील चित्रफीत बनविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 11:35 IST
Made a pornographic video of Women वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या अत्याचारांची चित्रफीतही आरोपी युवकाने तयार केली होती.
अत्याचार करून महिलेची अश्लील चित्रफीत बनविली
ठळक मुद्दे४२ वर्षीय महिलेची ३० वर्षीय युवकासोबत ओळख झाली. युवकाने महिलेशी संबंध प्रस्थापित केले. चित्रफीतही आरोपी युवकाने तयार केली होती.