शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नाेटा बदलून देण्याचे आमिष; व्यापाऱ्याला ९६ लाखांचा चुना; 8 जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 21:52 IST

याबाबत एमआयडीसी ठाण्यात साेलापूर, लातूर, रेणापूर, बीड, कळंबमधील आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

लातूर : कळंबच्या एका व्यापाऱ्याकडून ५०० च्या ९६ लाख रुपयांच्या नाेटा घेऊन त्यांना दाेन हजारांच्या १ काेटीच्या नाेटा देण्याचे आमिष दाखवीत गंडविल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी ठाण्यात साेलापूर, लातूर, रेणापूर, बीड, कळंबमधील आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, शनिवार, ८ जुलै राेजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कळंबमधील व्यापारी अजिंक्य अभय देवडा (वय ३२) यास मयूर धाेका (रा. कळंब, जि. धाराशिव), श्याम घाेगरदरे, संदीप शिवणीकर, बालाजी रसाळकर (तिघेही रा. साेलापूर), मेघश्याम पांचाळ (रा. चव्हाणवाडी, ता. गेवराई जि. बीड), इमाम शेख (रा. भाेकरंबा, ता. रेणापूर), किशाेर माने (रा. चाडगाव, ता. रेणापूर), बालाजी काेयले (रा. लातूर) यांनी आमच्याकडे दाेन हजारांच्या नाेटा आहेत. तुम्ही ५०० रुपयांच्या ९६ लाख रुपये किमतीच्या नाेटा घेऊन या. आम्ही तुम्हाला १ काेटी मूल्याच्या दाेन हजारांच्या नाेटा देताे, असे आमिष दाखविले. ९६ लाख रुपये, ५०० रुपयांच्या नाेटांच्या स्वरूपात अजिंक्य देवडा हे घेऊन आले. ८ जुलै राेजी सायंकाळी हरंगुळ रेल्वेस्थानक परिसरात एका गाेदामात नाेटांची अदलाबदल करण्याचे प्रकार सुरू हाेते. खबऱ्याने विवेकानंद चाैक ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुधाकर बावकर, पाेउपनि. महेश गळगटे, पाेहेकाॅ. संजय बेरळीकर, विनाेद चलवाड, पाेहेकाॅ. यादव यांच्या पथकाला माहिती दिली.

अचानकपणे गाेदामावर पाेलिसांनी मारला छापा...खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने गाेदामावर छापा मारला. दरम्यान, घटनास्थळी एमआयडीसी ठाण्याचे पाेलिसही दाखल झाले. त्यानंतर रविवारी दिवभर लातूर शहरात बनावट नाेटा सापडल्याची चर्चा सुरू हाेती. या नाेटा खऱ्या की खाेट्या, याचीही चर्चा सुरू हाेती.

...तर दाेन दिवसांनंतर माहिती पडली बाहेर..!एमआयडीसी ठाण्याच्या हद्दीत ९६ लाखांच्या नाेटांबाबत कारवाई केल्यानंतर लातुरात चर्चेला उधाण आले. याबाबत ठाणे प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क हाेत नव्हता. घटनेची माहिती विचारली असता, तपास सुरू आहे. अद्याप नाेंद नाही, अशीच उत्तरे मिळत आहेत. शनिवारी झालेल्या कारवाईची माहिती दाेन दिवसांनंतर बाहेर पडली, हे विशेष..!

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरPoliceपोलिस